आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलचा लिलाव ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यापूर्वी सर्व ८ संघांनी बदली खेळाडूंची घोषणा केली. अनेक खेळाडूंना संघांनी खराब कामगिरीमुळे बाहेर केले. यादरम्यान १० जानेवारीपासून सुरू झालेल्या टी-२० मुश्ताक अली ट्रॉफीच्या साखळी फेरीतील सामने समाप्त झाले. म्हणजे १६९ पैकी १६२ सामने संपले. साखळी फेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची लिलावात निवड होऊ शकते. यात केरळचा यष्टिरक्षक फलंदाज मो. अझहरुद्दीन, सौराष्ट्राचा फलंदाज अवी बरोट व जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज मुज्तबा युसूफ यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. अशाच ११ खेळाडूंचे विश्लेषण.
या ११ खेळाडूंना अद्याप आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही; सौराष्ट्राचे सर्वाधिक तीन
फलंदाज
१. मो. अझहरुद्दीन (२६ वर्ष): केरळचा यष्टिरक्षक फलंदाज अझहरुद्दीनने ५ सामन्यांत १९५ च्या स्ट्राइक रेटने २१४ धावा काढल्या. १५८ धावा चौकाराने काढल्या. एक शतक ठोकले. करिअरच्या एकूण २४ टी-२० सामन्यांत २३ व्या सरासरीने ४५१ धावा केल्या. स्ट्राइक रेट १४२.
२. अवी बरोट (२८ वर्षे): सौराष्ट्राचा सलामीवीर फलंदाज बरोटने ५ सामन्यांत १८५ च्या स्ट्राइक रेट व ५७ च्या सरासरीने २८३ धावा काढल्या. १ शतक व १ अर्धशतक झळकावले. २०० धावा चौकाराने काढल्या. एकूण २० टी-२० सामन्यांत १४७ व्या स्ट्राइक रेट व ३८ व्या सरासरीने ७१७ धावा.
३. राहुल सिंग (२५ वर्षे): सर्व्हिसेसकडून खेळणाऱ्या फलंदाजाने ५ सामन्यांत १७७ च्या स्ट्राइक रेट व ८१ च्या सरासरीने २४४ धावा केल्या. ३ अर्धशतके. १६० धावा चौकाराने काढल्या. एकूण टी-२० च्या ३१ सामन्यांत २३ व्या सरासरीने ५६८ धावा केल्या.
४. व्यंकटेश अय्यर (२६ वर्षे): स्पर्धेत २२७ धावा केल्या.
गोलंदाज
१. आशुतोष अमन (३४ वर्षे): बिहारच्या फिरकीपटूने ५ सामन्यांत सर्वाधिक १४ बळी घेतले. इकॉनॉमी ४.५५ आहे. २ वेळा ४ बळी. एकूण १७ टी-२० मध्ये ६.८१ च्या इकॉनॉमीने २१ बळी.
२. चेतन सकारिया (२२ वर्षे): सौराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजाचे ५ सामन्यांत १२ बळी. इकॉनॉमी ४.९०. एकदा ५ बळी. एकूण १६ टी-२० मध्ये २८ बळी.
३. मुज्तबा युसूफ (१८ वर्षे): जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाजाचे ४ सामन्यांत ५ बळी.. मुंबई इंडियन्सच्या चाचणीत सहभागी झाला. ४. लुकमान मेरीवाला (२९ वर्षे): ११ बळी. ५. दर्शन नाळकंडे (२२ वर्षे): ११ बळी.
अष्टपैलू
१. प्रेरक मांकड (२६ वर्षे): सौराष्ट्राच्या प्रेरकने ५ लढतीत ५१ च्या सरासरी व १८१ च्या स्ट्राइक रेटने २०५ धावा केल्या. वेगवान गोलंदाजीत ६ बळी घेतले. २८ टी-२० मध्ये ५७९ धावा व २० बळी.
बंगळुरूचे सर्वाधिक १० खेळाडू मुक्त; सॅमसन राजस्थानचा नवा कर्णधार
आयपीएलच्या ८ संघांनी बुधवारी मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. बंगळुरूने सर्वाधिक १० खेळाडूंना मुक्त केले. राजस्थानने आपला कर्णधार स्टीव स्मिथची साथ सोडली. सॅमसनला संघाचा नवा कर्णधार बनवले. एकूण ५७ खेळाडूंना मुक्त करण्यात आले आहे. आता ११ जानेवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.