आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी:नाैशाद शेखच्या शतकाने महाराष्ट्राच्या 472 धावा, मुंबईचा 651/6 धावांवर डाव घोषित

राजकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणजी ट्रॉफीच्या ब गटातील सामन्यात नौशाद शेख (१०१) शतक व अंकित बावणेच्या (९६) अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्राविरुद्ध दुसऱ्या दिवसअखेर १७३ षटकांत ७ बाद ४७२ धावा केल्या.

प्रथम खेळताना महाराष्ट्राने पहिल्या दिवसाच्या २ बाद २५३ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. नाबाद नौशाद शेखने शतक पूर्ण केले. तो अवघ्या ४ धावांची भर घालून १०१ धावांवर तंबूत परतला. अंकित बावणेचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. त्याने २३७ चेंडूंत ९ चौकारांसह ९६ धावांची खेळी केली. अझिम काझीने २४ धावा जोडल्या. सौरभ नवलेने अर्धशतक झळकावले. त्याने १५३ चेंडूंत ८ चौकारांसह ७२ धावा काढल्या. सत्यजित बच्छावने २० धावा केल्या. अक्षय पालकर नाबाद ५१ धावांवर खेळत आहे. या खेळीत त्याने ११४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकार लगावला. सौराष्ट्राकडून चेतन साकिरया व देवांग कर्मटने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

अजिंक्य रहाणेचे प्रथम श्रेणीत चौथे दुहेरी शतक अजिंक्य रहाणेच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी ६५०+ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. दुसऱ्या दिवशी संघाने ३ बाद ४५७ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली. संघाने पहिला डाव ६ बाद ६५१ धावांवर घोषित केला. रहाणेने २६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने २०४ धावा केल्या. हे त्याचे चौथे प्रथम श्रेणीतील द्विशतक आहे. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी हैदराबादने पहिल्या डावाला सुरुवात केली. संघाने ५० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या.

बातम्या आणखी आहेत...