आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचा माजी क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना सोमवारी मध्यप्रदेशातील मुलताई पोलिसांनी गंडा घालण्याच्या प्रकरणात अटक केली.पोलिसांनी विनयओझा यांना कोर्टात हजर केले, कोर्टाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. नमन ओझा हा देखील पोलिस ठाण्यात हजर होता आणि वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्याला जामीन मिळवण्यात यश आले नाही.
काय आहे प्रकरण ?
वास्तविक, बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत 2013 साली बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत बनावट खाते उघडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे 1.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 2014 मध्ये तत्कालीन व्यवस्थापक नमनचे वडील विनय ओझा यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 2014 मध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून व्हीके ओझा फरार होते, ज्यांचा पोलीस 8 वर्षांपासून शोध घेत होते. मुलताई पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील लता यांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, त्याच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम 409, 420, 467, 468, 471, 120B, 34 आणि IT कायद्याच्या कलम 65, 66 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
नमन ओझा हा आहे भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू
नमन ओझा हा भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय नमनने 113 IPL सामनेही खेळले आहेत. नमनच्या कसोटीत 56 धावा, एकदिवसीय सामन्यात एक धाव आणि T20 मध्ये 12 धावा आहेत. त्याने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.