आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK v NZ दुसरी कसोटी:न्यूझीलंडच्या फलंदाजांनी रचला इतिहास, 10व्या विकेटसाठी केला विश्वविक्रम

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची येथील नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK v NZ) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या मैदानावर दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना रोमहर्षकरित्या ड्रा झाला. तर दुसऱ्या कसोटी सामन्यातही फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले.

पहिल्या दिवसअखेर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी संघाला पूर्वपदावर आणले असले, तरी दुसऱ्या दिवशी किवी संघाची 10वी विकेट लवकर बाद करण्यात यजमान संघाच्या गोलंदाजांना अपयश आले. मॅट हेन्री आणि एजाज पटेल यांनी 10व्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत न्यूझीलंड संघासाठी मोठा विश्वविक्रम केला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांनी 10व्या विकेटसाठी 100 हून अधिक धावांची सर्वोच्च भागीदारी केली आहे. किवी संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्यांदा हा पराक्रम केला असून त्याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाने 10व्या विकेटसाठी पाचवेळा शतकी भागीदारी केली होती.

पण आता हा मोठा विक्रम न्यूझीलंड संघाने मॅट हेन्री आणि एजाज पटेल यांच्या जोडीने केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 10व्या विकेटसाठीची शतकी भागीदारी ही न्यूझीलंड, त्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये (5 वेळा) सर्वोच्च आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर भारताचा हा विक्रम चार वेळा आहे.

हेन्रीच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडचे वर्चस्व
हेन्रीच्या अर्धशतकामुळे न्यूझीलंडचे वर्चस्व

मॅट हेन्री आणि एजाज पटेल यांनी कसोटी क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा केल्या

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडचा संघ 309/6 धावांवर होता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर 345 धावांत पाहुण्या संघाच्या 9 विकेट्स घेतल्या.

मात्र त्यानंतर मॅट हेन्री आणि एजाज पटेल यांनी 104 धावांची मोठी भागीदारी करत न्यूझीलंड संघाची धावसंख्या 449 पर्यंत पोहोचवली. मॅट हेन्रीने नाबाद 68 तर एजाज पटेलने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...