आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • New Zealand's Annual Income Is 270 Crores; Despite Being 14 Per Cent Lower Than The BCCI, The Team Is Number One In Tests

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:न्यूझीलंडचे वार्षिक उत्पन्न 270 कोटी; बीसीसीआयपेक्षा 14 टक्क्यांनी कमी असूनही संघ कसोटीत नंबर-वन

ख्राइस्टचर्च4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यशस्वी होण्याचे कारण : प्रथम श्रेणी क्रिकेट छोटे करून ताण कमी केला, अ संघाला लक्ष्य दिले

न्यूझीलंड संघ आपल्या ९० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच कसोटीचा नंबर-१ संघ बनला आहे. खेळाडूंसह न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचेदेखील कौतुक होत आहे. त्याचे कारण म्हणजे, जगातील क्रिकेट मंडळांच्या तुलनेत सर्वात कमी उत्पन्न न्यूझीलंड मंडळाचे असूनही संघाने हे शिखर गाठले. न्यूझीलंड मंडळाचे वार्षिक उत्पन्न जवळपास २७९ कोटी रुपये असून जे बीसीसीआयपेक्षा १४ पटीने कमी आहे. बीसीसीआयचे उत्पन्न ३७३० कोटी रुपये आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया मंडळाचे उत्पन्न २२९० कोटी आणि इंग्लंड व वेल्स क्रिकेट संघटनेचे ११५० कोटी रुपये उत्पन्न आहे. न्यूझीलंड मंडळाचे उत्पन्न इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट क्लब सरेपेक्षाही कमी असून सरेचे उत्पन्न ३१५ कोटी रुपये आहे.

मंडळ व खेळाडूंचे संबंध चांगले; विदेशी लीगमध्ये खेळण्यास परवानगी

खेळाडू व मंडळात मधुर संबंध आहेत. खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्यास रोखले जात नाही, ज्यातून ते कमाई करू शकतील. अशात मंडळावर पैसे देण्याचा दबाव येत नाही. अ संघावर काम करण्यासाठी मंडळाने घरची प्रथमश्रेणी स्पर्धा २०१८ पासून १० ऐवजी ८ फेरींची केली. त्याचा परिणामही दिसतोय आणि काइल जेमिसनसारखा खेळाडू त्यांना मिळाला. त्याने पहिल्या सहा कसोटींत तीन वेळा पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला. क्रिकेट आयर्लंडदेखील न्यूझीलंडची पद्धत लागू करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने उत्पन्नासाठी गत आयपीएल यूएईमध्ये आयोजित केले होते.

न्यूझीलंड सलग २ एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक

न्यूझीलंडच्या चांगल्या कामगिरीला अपवाद म्हटले जाऊ शकत नाही. संघाने सलग दोन वेळा २०१५ आणि २०१९ एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती. त्यांना गतवर्षी सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरही त्यांचे जबरदस्त रेकॉर्ड आहे.

आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन बिग थ्री संघाकडे

बिग थ्री म्हणजे भारत, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड. २०१६ ते २०२३ दरम्यान आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन याच ३ देशांकडे आहे. सर्वाधिक उत्पन्न व सर्वाधिक साधन-सुविधाही या तिघांकडे आहेत. युवा खेळाडूंना ओळखण्यासाठी व त्यांना तयार करण्यासाठी मोठा खर्च होतो. मात्र, न्यूझीलंडने मर्यादित खर्चात हे करून दाखवले आहे.

बातम्या आणखी आहेत...