आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी क्रिकेट:न्यूझीलंडच्‍या काॅन्वेचे पाकविरुद्ध शतक

कराचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डेवाेन काॅन्वे (१२२) आणि टाॅम लाॅथम (७१) यांनी सर्वाेत्तम खेळीतून न्यूझीलंड संघाला साेमवारी यजमान पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत दमदार सुरुवात करून दिली. यामुळे न्यूझीलंड संघाला दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३०९ धावा काढता आल्या. आता टीमचा टाॅम ब्लंडेल (३०) आणि ईश साेढी (११) मैदानावर कायम आहेत. पाककडून घरच्या मैदानावर सलमान चमकला. त्याने सर्वाधिक ३ बळी घेतले. नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार टीम साउथीचा हा निर्णय सलामीवीर लाॅथम आणि काॅन्वेने याेग्य ठरवला. या दाेघांनी संघाला १३४ धावांच्या भागीदारीची सलामी दिली.

बातम्या आणखी आहेत...