आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:न्यूझीलंडचा विंडीजविरुद्ध मालिका विजयाचा चाैकार; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानी

वेलिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान न्यूझीलंड संघाने आपल्या घरच्या मैदानावर कसाेटी मालिका जिंकण्याचा पराक्रम नाेंदवला. यजमान संघाने साेमवारी विंडीजवर मालिका विजय संपादन केला. न्यूझीलंडने सलग दुसऱ्या कसाेटीमध्ये पाहुण्या विंडीजला धूळ चारली. न्यूझीलंड संघाने सरस खेळी करताना डाव आणि १२ धावांनी दुसरी कसाेटी जिंकली. यासह यजमान संघाने दाेन कसाेटी सामन्यांची मालिका २-० ने आपल्या खिशात घातली. याशिवाय न्यूझीलंडने विंडीजविरुद्ध सलग चाैथी मालिका जिंकली आहे. न्यूझीलंडने पहिल्याच डावात ४६० धावांचा डाेंगर रचला हाेता. चाैथ्या दिवशी साेमवारी विंडीज संघाने कालच्या ६ बाद २४४ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. मात्र, विंडीज संघाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. नील वेगनर आणि ट्रेंट बाेल्टने घरच्या मैदानावर सरस गाेलंदाजी केली.त्यामुळे सकाळच्या सत्रातच पाहुण्याा विंडीज संघाची दाणादाण उडाली. त्यामुळे ७९.१ षटकांत विंडीजने ३१७ धावांवर गाशा गुंडाळला.

याच धडाकेबाज विजयाच्या बळावर न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपच्या गुणतालिकेत प्रगती साधली. आता हा संघ ३०० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे.कसाेटीत पदार्पण करणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाज जाेेशुआ डिसिल्व्हाने ५७ धावांची संयमी खेळी केली. मात्र, त्याला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही.यजमानांकडून नील वेगनर आणि ट्रेंट बाेल्टने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.शतकी खेळी करणारा हेन्री निकाेल्स हा सामनावीराचा मानकरी ठरला. तसेच मालिकेत ११ बळी घेणाऱ्या वेगवान गाेलंदाज काईल जेमिसनला मालिकावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले. त्याची या मालिकेतील कामगिरी उल्लेखनिय ठरली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser