आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानाचे स्थान:नितीन मेनन आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये सर्वात युवा, आंतरराष्ट्रीय सामन्यांत केली पंचगिरी 

दुबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 वनडे, 3 कसाेटी, 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली

भारताचे नितीन मेनन यांची नुकतीच आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये नियुक्ती झाली. भारताचे हे ३६ वर्षीय मेनन आयसीसीच्या या पॅनलमधील सर्वात युवा पंच ठरले आहेत. नितीन यांनी आतापर्यंत तीन कसाेटी, २४ वनडे आणि १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचांची भूमिका यशस्वीपणे बजावली आहे. यादरम्यानच्या पारदर्शक आणि अचूक निर्णयातून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळेच त्यांना हे मानाचे स्थान मिळवता आले. यातून त्यांना आयसीसीच्या एलिट पॅनलमधील आपले स्थान निश्चित करता आले. याशिवाय ते या पॅनलमध्ये स्थान मिळवणारे भारताचे तिसरे पंच ठरले आहेत. यापूर्वी माजी कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन आणि एस. रवी यांनी हा बहुमान पटकावलेला आहे.

२०२०-२१ च्या सत्रासाठी आता मेनन हे या एलिट पॅनलमधून पंचाची भूमिका बजावणार आहेत. यांच्यापूर्वी इंग्लंडच्या नाइजल लाॅग्न यांनी वयाच्या ४० व्या वर्षी या पॅनलमध्ये स्थान मिळवले हाेते. 

नितीन यांना पंचगिरीचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय पंच आणि वडील नरेंद्र यांच्याकडून मिळाले. त्यांचे वडीलही पंच हाेते. नितीन यांनी वयाच्या २३ व्या वर्षापासून पंचाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्यांनी २०१८ आणि २०२० च्या महिला टी-२० विश्वचषकात पंच म्हणून कामगिरी केली आहे. यातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...