आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • No Danger Of Corona From Cricket Ball; Destroy The Virus On The Ball In 30 Seconds After Cleaning With An Infected Cloth!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:चेंडूमुळे कोरोनाचा धोका नाही; संक्रमित कपड्याने स्वच्छ केल्यावर 30 सेकंदांत चेंडूवरील व्हायरस नष्ट!

लंडन10 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • ऑक्सफर्ड विद्यापीठातील संचालकांच्या मते, क्रिकेट ठरताेय कमी धोक्याचा खेळ

कोरोनादरम्यान ८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सनने म्हटले की, चेंडूमुळे संक्रमणाचा धोका आहे. त्यानंतर माजी कर्णधार मायकल वॉनने पंतप्रधानांवर टीका केली होती. मात्र, इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन आणि स्वीडनच्या कारोलिंस्का इन्स्टिट्यूटचा अहवाल पंतप्रधानाच्या प्रतिक्रियेच्या उलट आहे. संशोधनात आढळले की, चेंडूला संक्रमित कपड्याने स्वच्छ केले तरी देखील ३० सेकंदांनंतर चेंडूवर व्हायरस आढळला नाही. यादरम्यान इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेटला परवानगी मिळाली. ११ जुलैपासून त्याची सुरुवात होईल. अहवालात म्हटले की, जर सुपर काँट्रॅक्ट केलेल्या नमुन्याचा वापर चेंडूवर केला गेला तर, ते टिश्यू पेपरने साफ करूनच ते सुरक्षित केले जाऊ शकते. चेंडूच्या अाकारामुळे ड्रॉपिंग व रोलिंगदरम्यान संक्रमण पसरण्याचा धोका नाही.

सरकारचे वरिष्ठ तज्ञ सल्लगाराने म्हटले की, आम्ही वैज्ञानिक दृष्टीने त्यावर कोणते काम केले नाही, मात्र चेंडू आमच्यासाठी मोठी समस्या नाही. त्यानंतर इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) खेळाला कमी धोकादायक म्हटले आणि त्याला नॉन काँटॅक्ट असलेला खेळ मानले.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील संचालकांच्या मते, क्रिकेट ठरताेय कमी धोक्याचा खेळ

ऑक्सफर्ड विद्यापीठातील सेंटर फॉर एव्हिडेन्स बेस्ट मेडिसीनचे संचालक कार्ल हेनेगनने म्हटले की, क्रिकेट कमी धोकादायक खेळ आहे. तुम्ही सँडविच खाताना व चहा पिताना जास्त धोका असतो, क्रिकेट खेळण्यापेक्षा. विज्ञान म्हणते, उजेडात व खुल्या मैदानात खेळणे कमी धोक्याचे असते. यूवी लाइटमध्ये व्हायरस मरतात. क्रिकेटमध्ये फुटबॉल किंवा रग्बी सारखा धोका नसतो. या खेळासारखा धोका नसतो. या दोन्ही खेळात खेळाडू एकमेकांना भिडतात, तर क्रिकेटमध्ये दूर-दूर राहतात.

बातम्या आणखी आहेत...