आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडने त्याचा 10 गडी राखून पराभव केला. पराभवाची अनेक कारणे असून त्यांचे पोस्टमॉर्टमही सुरू झाले आहे. त्यामध्ये एक प्रश्न प्लेइंग इलेव्हनमधील स्पिर्नसच्या निवडीबाबत सुद्धा आहे.
आमच्या विश्वचषक संघात तीन स्पेशालिस्ट स्पिनर खेळाडू होते. रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल. संघ व्यवस्थापनाने प्रत्येक सामन्यात अश्विनला संधी दिली, जो कधीकाळी T-20 फॉरमॅटसाठी योग्य खेळाडू मानला जात नव्हता. इकडे चहलने डगआऊटमधून सामना पाहिला.
दुसरीकडे, पाकिस्तानचा शादाब खान असो किंवा इंग्लंडचा आदिल रशीद, दोघेही केवळ प्लेइंग इलेव्हनमध्येच खेळलेच नाहीत तर ते खूप यशस्वीही झालेत. आम्ही त्यांची कामगिरी ग्राफिक्समध्येही पाहणार आहोतच.
मात्र, चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी का देण्यात आली नाही? आणि हे प्रश्न फक्त आम्हीच विचारत नाही, तर सुनील गावस्कर आणि हरभजन सिंग यांनीही टीव्ही कॉमेंट्रीमध्ये या गोष्टींचा उल्लेख केला आहे.
चहलचे प्रशिक्षक रणधीर सिंग यांच्याकडून या बोचणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. येथे जाणून घेऊ या कोच रणधीर काय म्हणाले…
प्रश्न- युझवेंद्र चहलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करण्याचा निर्णय योग्य होता का? कारण बाकीच्या संघांनी लेगस्पिनर्सना संधी दिली.
उत्तर- संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय आहे. व्यवस्थापन हे संघाच्या हिताचे निर्णय घेत असतो. संघ व्यवस्थापन बेस्ट कॉम्बिनेशनलाही संधी देते.चहलच्या बाबतीत बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियात मैदाने मोठी आहेत. फलंदाजांची शैली पाहून चहल त्यांच्यावर अटॅक करतो, कदाचित तो यावेळी X फॅक्टर असल्याचे सिद्ध झाला असता.
उर्वरित संघांनी प्लेइंग इलेव्हनमधील लेगस्पिनर्सना खेळण्याची संधी दिली. मला वाटतं चहललाही संधी देता आली असती, पण मग मी म्हणेन की हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे आणि ते सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनला संधी देतात.
या विश्वचषकात चहलच्या जागी आलेल्या अक्षर पटेलची कामगिरी कशी होती. तुम्ही खालील ग्राफिक्स मध्ये पाहू शकता...
प्रश्न- उपांत्य फेरीत इंग्लंडने आदिल रशीदला संधी दिली आणि तो यशस्वी ठरला. आम्ही चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायला नको होती का?
उत्तर-पाहा, चहलला पहिल्याच सामन्यापासून संधी द्यायला हवी होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. चहल हा भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. आणि तीच गोष्ट सुनील गावसकर, हरभजन सिंग आणि आकाश चोप्रा सारखे मोठे खेळाडू चहलला संधी द्यायला हवे होते असे म्हणत होते, पण नंतर पुन्हा तीच गोष्ट आहे की संघ व्यवस्थापन परिस्थिती पाहून निर्णय घेते.
प्रश्न- पुढील वर्षी वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. त्या विश्वचषकाच्या संदर्भात चहलबद्दल तुमचे काय मत आहे?
उत्तर-वनडे विश्वचषकाला अजून एक वर्ष बाकी आहे. सध्याच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर चहल चांगली कामगिरी करत आहे. वनडे सामन्यांमध्ये लांबलचक स्पेल असतात आणि या फॉरमॅटमध्ये त्याचा रेकॉर्डही चांगला आहे. चहलला तिथे संधी मिळेल आणि तो चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया.
प्रश्न- उपांत्य फेरीत आम्ही बचावात्मक दिसत होतो आणि इंग्लंड आक्रमणाच्या मोडवर होते. यावर आपले मत काय?
उत्तर-ते परिस्थितीवर अवलंबून असते. संपूर्ण स्पर्धेत आमची सलामीची भागीदारी चांगली झाली नाही. साहजिकच आहे, जेव्हा तुम्हाला सलामी योग्य मिळत नाही तेव्हा तुम्हाला बचावात्मक खेळणे आवश्यक आहे.
जर आपण इंग्लंडबद्दल बोललो तर त्यांची एकही विकेट पडली नाही. त्यामुळे ते आक्रमक खेळत राहिले. असे होऊ शकत नाही की तुमच्या विकेट पडत राहिल्या आणि तुम्ही आक्रमण करत रहा. दबाव तर हा येत असतो.
प्रश्न- संघ तयार करण्याच्या प्रयोगांबद्दल काय? आम्ही 30 खेळाडूंवर प्रयोग केले? दीपक हुडालासुद्धा सलामीला पाठवून पाहिले?
उत्तर-टीम कॉम्बिनेशनसाठी प्रयोग करणे अगदी चुकीचे नाहीत. जर तुम्ही कॉम्बिनेशनचा प्रयत्न केला नाही, प्रयोग केले नाहीत, तर युवा खेळाडूंना संधी कशी मिळणार? होय, पण नक्कीच, त्याचा आपल्याला परिणाम पाहावा लागेल. आमचा संघ यावेळीही जवळपास तसाच होता, जो गेल्या विश्वचषकात खेळला होता. आणि जे खेळले नाहीत जसे जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा ते अनफिट असल्यामुळेच.
भारताचे फलंदाज ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी लेगस्पिनरसमोर संघर्ष करताना दिसले. त्याचबरोबर चहलच्या जागी संधी मिळालेल्या रविचंद्रन अश्विनने या विश्वचषकात कशी कामगिरी केली. ते तुम्ही या ग्राफिक्समध्ये देखील पाहू शकता...
प्रश्न- त्यामुळे हे प्रयोग यशस्वी झाले नाहीत असे तुम्हाला वाटते का?
उत्तर-नाही. असे नाही. चहल शेवटचा विश्वचषक खेळला नव्हता. यापूर्वी तो दुबईत चांगली कामगिरी करत होता. मागचा विश्वचषकही तिथेच खेळला गेला होता, पण कर्णधार असो की प्रशिक्षक, सांघिक कॉम्बिनेशन बनवण्यासाठी प्रयोग करावे लागतात. त्याशिवाय काम करता येत नाही. हो, मात्र परिणाम देखील पाहणे महत्त्वाचे ठरते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.