आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Not Injury, Difficulty Fitness; The NCA Has Been Waiting For The High Performance Center For Ten Years

क्रिकेट:दुखापत नव्हे, अडचण फिटनेसची; एनसीए दहा वर्षांपासून हाय परफॉर्मन्स सेंटरच्या प्रतीक्षेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवा खेळाडू लाेकेश राहुल आता दुखापतीतून सावरत आहे. ताे सहकारी मित्रांसाेबत काैटुंबिक गेट टुगेदरमध्ये सहभागी झाला. याचाच फाेटाे त्याने शेअर केला. - Divya Marathi
युवा खेळाडू लाेकेश राहुल आता दुखापतीतून सावरत आहे. ताे सहकारी मित्रांसाेबत काैटुंबिक गेट टुगेदरमध्ये सहभागी झाला. याचाच फाेटाे त्याने शेअर केला.
  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचे आठ खेळाडू जायबंदी, अधिक वर्कआऊटने पाच जखमी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळाडूंच्या दुखापतीने अनेकांना गोंधळात टाकले. मात्र, हे आपण पाहतो, त्या पद्धतीने चिंतेचे कारण नाही. प्रथम आपण वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व रोहित शर्माचा विचार करू. दोघे दौऱ्यापूर्वी जखमी होते.

ईशांत तंदुरुस्त होता, मात्र तो गोलंदाजी करू शकत नव्हता. फिटनेस (तंदुरुस्ती) दोन प्रकारचा असतो. सामन्यासाठी आवश्यक तंदुरुस्ती आणि सामान्य तंदुरुस्ती. ईशांत कसाेटीत २५-३० षटके गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त नव्हता. तो मुश्ताक अली ट्राॅफीमध्ये दिल्लीकडून खेळत आहे आणि आपल्या लयीत आला. मात्र, रोहित बाबत गोंधळाची परिस्थिती आहे. त्याच्या दुखापतीचे मुख्य कारण काय आहे, हे रहस्य अद्याप उघड झाले नाही. कारण, हॅमस्ट्रिंग दुखावणे अति ताणामुळे होते. दौऱ्यात मो. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, हनुमा विहारी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व लोकेश राहुल जखमी झाले. यात शमी, जडेजा व राहुल चेंडू लागल्याने जखमी झाले. हे कोणासोबत व कधीही होऊ शकते, ही मुख्य समस्या नाही. उमेश, सैनी, विहारी, बुमराह व अश्विनची दुखापत विचार करण्याची गोष्ट आहे. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या शरीर थकल्याने होते. खेळाडू तिन्ही प्रकारात खेळत आहेत. काही खेळाडू जसे संजू सॅमसन, शिखर धवन, दीपक चाहर व श्रेयस अय्यर यापासून दूर आहेत. प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटची तयारी वेगळी असते. छोट्या प्रकारात तुम्ही सलग खेळत असतात, मात्र कसोटीमध्ये त्याच्या शरीर क्षमतेचा कस लागतो. आपले खेळाडू चार महिने विना खेळता व विना सरावाचे आयपीएल खेळण्यास गेले. त्यानंतर पुन्हा क्वारंटाइन झाले व पुन्हा ऑस्ट्रेलियात खेळण्यास उतरले. खेळाडूंना जबरदस्ती हॉटेलमध्ये क्वारंटाइन केल्याने मानसिक तंदुरुस्तीवर परिणाम झाल्याचे म्हणता येईल.

जैव सुरक्षित वातावरणामुळे खेळाडूंना मानसिकदृष्ट्या त्रास झाला आहे. कारण, खेळाडूंना खोली बाहेर पडण्यास परवानगी नव्हती. त्यांना खुल्या जिममध्ये व जलतरणासाठी जाण्यास मज्जाव होता. आयपीएलदरम्यान अनेक गोष्टी चांगल्या होत्या. फ्रँचायझीकडे आपली व्यवस्था होती आणि खेळाडू इतरत्र जाऊ शकत होते. ऑस्ट्रेलियामधील नियम कठोर होते. हॉटेलमध्ये राहिल्याने खेळाडू स्वत:ला तयार करू शकले नाही. उदाहरण, हनुमा विहारीला अंतिम-११ मध्ये खेळण्याबाबत शंका होती, त्यामुळे ताे दबावात होता. खेळाडूंनी स्वत:वर ताण ओढून घेतला होता. त्याचा कमजोर बाजूवर परिणाम होतो, त्यामुळे अनेक जण जखमी झाले. खेळादरम्यान मानसिक तणाव वेळेनुसार बदलत जातो. तज्ज्ञांच्या मते, दुखापतीचे आपण योग्य व्यवस्थापन करू शकतो. मात्र, दीर्घ जैव सुरक्षित वातावरणामुळे मानसिक तणाव अधिक परिणाम करून गेला.

भारताचे कामाच्या ताणावरील व्यवस्थापन योग्य नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) उपयोग रिहॅबसाठी केला जातो. तज्ज्ञांच्या मते, भारताचे फिटनेस व्यवस्थापन ऑस्ट्रेलिया पेक्षा दोन व इंग्लंड पेक्षा एक दशक मागे आहे. गत फिजिओने व्यवस्थापन प्रस्ताव तयार केला होता, मात्र ते गेल्यानंतर ताे रद्द करण्यात आला. एनसीए एक दशकापासून हाय परफॉर्मन्स सेंटरच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप ते तयार झाले नाही. हा दौरा आपले डोळे उघडणारा ठरेल. पूर्णपणे खेळाडूंचा ताण व फिटनेस व्यवस्थापन करण्याची गरज आहे. भारताला स्थानिक पातळीवर बदल करावा लागेल. अन्यथा ही समस्या कायम राहील.

बातम्या आणखी आहेत...