आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs Afghanistan Asia Cup Updates; Rohit Sharma Virat Kohli Hardik Pandya Suryakumar Yadav, Now Fear Of Defeat From Afghanistan: India's Last Match In Asia Cup Today, Know The Playing Eleven Of Both Teams

भारताचा अफगाणिस्तानवर 101 धावांनी विजय:3 वर्षांनंतर कोहलीचे शतक; ठोकल्या 122 धावा; भुवनेश्वरने घेतल्या 5 विकेट्स

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर असलेल्या टीम इंडियाने आशिया चषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा शेवट विजयासह केला. भारताने त्यांच्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात अफगाणिस्तानचा एकतर्फी 101 धावांनी पराभव केला.

अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना अफगाणीस्तानविरुद्ध 213 धावांचे लक्ष्य ठेवले.

भारताच्या धावांच्या डोंगरापुढे प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाचा डाव गडगडला. त्यांच्या 20 षटकांत 8 गडी बाद 111 धावा केल्या. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार याने पाच गडी बाद केले. विराट कोहलीने दमदार शतक ठोकत 122 धावा कुटल्या त्याला सुर्याने अर्धशतक करून साथ दिली.

या सामन्यातील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे विराट कोहलीचे 71 वे आंतरराष्ट्रीय शतक. किंग कोहलीने तब्बल 3 वर्षांनंतर (1020 दिवस) शतक केले आहे. त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक आहे. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या केएल राहुलने 62 धावा केल्या.

प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 111 धावा करता आल्या. इब्राहिम झद्रानने 62 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 5 बळी घेतले. अफगाणिस्तानचा संघही विराट कोहलीच्या धावसंख्येपेक्षा 11 धावांनी मागे पडला.

विराट कोहलीने हे शतक पत्नी अनुष्का शर्मा आणि वैतिती वामिकाला समर्पित केले.
विराट कोहलीने हे शतक पत्नी अनुष्का शर्मा आणि वैतिती वामिकाला समर्पित केले.

किंग कोहलीचे 2019 नंतर शतक

विराटने तब्बल तीन वर्षांनंतर (1020 दिवस) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले आहे. यापूर्वी, त्याने 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्धच्या कोलकाता कसोटीत आपल्या कारकिर्दीतील 70 वे शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे पहिले शतक आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहलीने आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर ७१-७१ शतके आहेत. सचिन तेंडुलकर 100 शतकांसह आघाडीवर आहे.

टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये आज तीन बदल केले आहेत. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल हे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहेत. त्याच्या जागी दीपक चहर, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल संघाचा भाग बनले आहेत.

विराट कोहलीचे 71 वे शतक

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कारकिर्दीतील 71 वे शतक ठोकले आहे. 1 हजार 20 दिवसांनंतर त्याने बॉलने शतक झळकावले. याआधी, विराटचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्धच्या कोलकाता कसोटीत झाले होते.

कोहलीने 53 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कोहलीचा शतकाचा अंदाजही बऱ्यापैकी चमकदार होता. फरीद मलिकचा चेंडू डीप-मिडविकेटवर सहा धावांवर पाठवून त्याने आपले शतक पूर्ण केले.

विराटने टी-20 कारकिर्दीत 32 वे अर्धशतक आणि अफगाणिस्तानविरूद्ध पहिले शतक झळकावले.
विराटने टी-20 कारकिर्दीत 32 वे अर्धशतक आणि अफगाणिस्तानविरूद्ध पहिले शतक झळकावले.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने अप्रतिम फलंदाजी केली.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने अप्रतिम फलंदाजी केली.
विराट आणि केएल राहुल ही जोडी अफगाणिस्तानविरुद्ध सलामीवीराच्या रूपात आली होती.
विराट आणि केएल राहुल ही जोडी अफगाणिस्तानविरुद्ध सलामीवीराच्या रूपात आली होती.

या सामन्यापूर्वी टीम इंडियाने तीन बदल केले आहेत. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि युझवेंद्र चहल हे प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहेत. त्याचवेळी त्यांच्या जागी दीपक चहर, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल संघाचा भाग बनले आहेत.

भारत-अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन

भारत: केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर, आर अश्विन

अफगाणिस्तान - हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, करीम जन्नत, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला ओमरझाई, रशीद खान, माजीब उर रहमान, फरीद अहमद, फझलहक फारुकी

सामन्याचे लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

दोन्ही संघ विजयासाठी जोर लावणार

आशिया चषक स्पर्धेत सुपर-4 मधील 2 सामने गमावल्यानंतर दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आजचा सामनाही जिंकण्यासाठी भारतीय संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे.

याचे कारणही तसेच आहे, सध्या भारतीय संघातील अनेक खेळाडूंचा फॉर्म चांगला नाही. भारताचे आघाडीचे फलंदाज सतत अपयशी ठरत आहेत. तर दुसरीकडे भारतीय वेगवान गोलंदाजही सातत्याने खराब कामगिरी करत आहेत. पहिल्या सामन्यात चांगली खेळी केल्यानंतर हार्दिकची फलंदाजी शांत दिसली तर तो गोलंदाजीमध्येही काही विशेष करू शकलेला नाही.

तर अफगाणिस्तान संघाने बुधवारी पाकिस्तानला काटे की टक्कर अशी झुंज दिली. मात्र, या रोमहर्षक सामन्यात त्यांनी हा सामना 1 विकेटने गमावला, मात्र त्याआधी अफगाणिस्तनने आशिया चषकाच्या गट टप्प्यातील सामन्यात श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव केला होता.

जर अफगाणिस्तान हा सामना जिंकला असता तर कदाचित भारतासाठी वेगळी आशा निर्माण झाली असती. आशिया चषक स्पर्धेतील अफगाणिस्तानचाही हा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघांचे चाहते स्टार स्पोर्ट्सवर हा सुपर 4 सामना पाहू शकतात. हॉटस्टार हा सामना ऑनलाइन स्ट्रीम करेल.

पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात खाते न उघडता बाद झालेल्या विराट कोहलीकडून आज मोठी खेळी अपेक्षित आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात खाते न उघडता बाद झालेल्या विराट कोहलीकडून आज मोठी खेळी अपेक्षित आहे.

भारताला अफगाणिस्तानविरुद्ध जिंकून शेवट गोड करायचा आहे

आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांची कथा सारखीच होती. दोन्ही आशियाई संघांनी ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकले होते. भारताने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव केला होता.

दुसरीकडे अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव केला. सुपर 4 मध्ये या संघांनी अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. दोन्ही संघांना गुणतालिकेत आपले खाते उघडायचे आहे.

भारत आणि अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय T-20 मध्ये एकमेकांविरुद्ध एकूण 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

राशीद खानने बुधवारी पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना 4 षटकांत 25 धावा देऊन 2 बळी घेतले.
राशीद खानने बुधवारी पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी करताना 4 षटकांत 25 धावा देऊन 2 बळी घेतले.

भारताने अफगाणिस्तानविरुद्ध शेवटचा सामना 2021 च्या टी-20 विश्वचषकात खेळला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानला 211 धावांचे लक्ष्य दिले होते. या डावात भारतीय कर्णधार रोहित शर्माने 74 धावा केल्या. तर अफगाणिस्तानचा संघ केवळ 144 धावा करू शकला.

या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 3 बळी घेतले.भारताला त्यांच्या शेवटच्या सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे. यासाठी भारताच्या टॉप-3 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. हार्दिकला धावा कराव्या लागतील आणि गोलंदाजांनाही त्यांचा फॉर्म परत आणावा लागेल.

भारतीय संघ व्यवस्थापन आज प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते.
भारतीय संघ व्यवस्थापन आज प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते.

टॉस जिंकेल तो मॅच जिंकेल

हा सामना UAE मधील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. गेल्या सामन्यांवरून असे दिसून येते की दुबईची पिच थोडी स्लो झालीये.अशा स्थितीत पहिल्या डावातील पिच गोलंदाजांसाठी चांगली ठरेल. तर दुसऱ्या डावात या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा करणे सोपे जाईल.

या आशिया चषकात दुबईमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मुख्यता निराशेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे कोणताही कर्णधार हा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

बातम्या आणखी आहेत...