आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनआरबी संघाने एसएससीएए औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेचा चषक आपल्या नावे केला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात एनआरबी संघाने ग्रामीण पोलिस संघावर ४ गडी राखून मात केली. गरवारे क्रीडा संकुलावर झालेल्या या लढतीत सचिन शेडगे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. नाणेफेक जिंकून ग्रामीण पोलिसांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पोलिसांनी २० षटकांत ९ बाद १२८ धावा उभारल्या. विजेत्या व उपविजेत्या संघाला मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अॅड. एस.आर. नेहरी, सचिन पगारिया, चंद्रशेखर चौधरी, ज्ञानेश्वर राजळे यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी अॅडव्होकेट स्पोर्ट््स अँड कल्चरल असोसिएशनचे अॅड.गोपाळ पांडे, अॅड. संकर्षण जोशी, अॅड. गणेश अनसिंगकर, अॅड. बाळासाहेब वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
शेडगेची अर्धशतकी खेळी
एनआरबीने १६.३ षटकांत ६ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सचिन शेडगेने ३६ चेंडूंत ५० धावा ठोकल्या. कर्णधार विनोद लांबेने २८ चेंडूंत ३५ धावा काढल्या. सचिन y विनोद जोडीने पहिल्या गड्यासाठी ८७ धावांची सलामी दिली. महेश निकमने १३ धावा व व्यंकटेश सोनवलकरने १३ धावांचे योगदान दिले. संदीप राठोड ४ धावांवर नाबाद राहिला. पोलिसांकडून किरण लहानेने २ बळी घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.