आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवल्याबद्दल अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की, मंडळ आणि निवडकर्त्यांनी मिळून रोहितला पांढऱ्या चेंडू क्रिकेटचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मंडळाने विराटला टी-२० कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती, असा खुलासाही गांगुलीने केला. तो म्हणाला, ‘हा निर्णय मंडळ आणि निवडकर्त्यांनी मिळून घेतला आहे. बीसीसीआयने विराटला टी-२० चे कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती, परंतु त्याने मान्य केले नाही. पांढऱ्या चेंडूच्या दोन प्रकारात वेगवेगळे कर्णधार असणे निवडकर्त्यांना योग्य वाटले नाही.’ गांगुलीने म्हटले की, त्याबाबत त्याने स्वत: विराटशी चर्चा केली. दादाने म्हटले की, ‘विराट कसोटीचा कर्णधार असेल आणि रोहित पांढऱ्या चेंडूचा कर्णधार असेल, असे आम्ही ठरवले. मी स्वतः विराटशी अध्यक्ष म्हणून बोललो आहे आणि निवड समितीचे अध्यक्षही त्याच्याशी बोलले आहेत.’
भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार के.एल. राहुलला एकदिवसीयमध्ये ही जबाबदारी मिळू शकते. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव राहुलकडे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.