आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022, PAK Vs AFG Match Today: India's Hopes On Afghanistan Win; Both Are Facing Each Other For The First Time In The Asia Cup

आज PAK vs AFG सामना:भारताच्या आशा अफगाणिस्तानच्या विजयावर; आशिया चषकात दोन्ही टीम पहिल्यांदाच आमनेसामने ​​​​​​​

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषक स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-4 चा सामना रंगणार आहे. शारजाच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात करोडो भारतीय चाहत्यांच्या प्रार्थना अफगाणिस्तानसोबत असणार आहे कारण, त्याच्या विजयावरच भारताच्या अंतिम फेरीतील आशा पल्लवित राहतील.

तसेच याबरोबरच अफगाणिस्तान जिंकल्यास 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात भारताला श्रीलंकेच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागणार आहेच

पाकिस्तानचा दोनदा पराभव झाल्यानंतरच भारत अंतिम फेरीत पोहोचेल. जर आजचा सामना पाकिस्तानने जिंकल्यास भारत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.

पाकिस्तानी वेगवान गोलंदाज विरुद्ध अफगाणिस्तान स्पिनर्स

आज शारजाहच्या छोट्या मैदानावर पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज विरुद्ध अफगाणिस्तानच्या स्पिनर्सची लढत पाहायला मिळणार आहे. अफगाणिस्तानचा स्पिनर मुजीब उर रहमानने 3 सामन्यात 5.83 च्या इकॉनॉमीने 7 विकेट घेतल्या आहेत. तो त्याच्या संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे, तर राशिद खाननेही याच सामन्यात 6.08 च्या इकॉनॉमीने 4 बळी घेतले आहेत आणि तो त्याच्या संघाचा दुसरा यशस्वी गोलंदाज आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याने तीन सामन्यांत 7.90 च्या इकॉनॉमीने पाच विकेट्स घेतल्या आहेत. नसीम शाहने भारतीय संघाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली.

पहिल्या सामन्यात त्याने 27 धावांत दोन बळी घेतले होते, तर भारतीय संघाविरुद्ध सुपर-4 मध्ये 45 धावांत एक विकेट घेतली होती. हाँगकाँगविरुद्ध अवघ्या 7 धावांत दोन बळी घेतले. तर हॅरिस रौफने तीन सामन्यांत एक विकेट घेतली आहे. दोन्ही संघांचे फलंदाज आणि गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

रेकॉर्ड बुकमध्ये पाकिस्तानचे पारडे जड

अफगाणिस्तान-पाकिस्तानचा T-20 इतिहास पाहिला तर पाकिस्तानचे पारडे जड दिसते. 2013 पासून आतापर्यंत दोघांमध्ये 2 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यात पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले आहेत. एक 2013 मध्ये आणि दुसरा 2019 मध्ये खेळला गेला.

खेळपट्टी आणि स्थिती... आज पुन्हा मोठ्या धावसंख्येची आशा आहे

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमला मोठी धावसंख्या करायची इच्छा असेल. जसे मागील दोन सामन्यांप्रमाणे. याठिकाणी पाकिस्तानने हाँगकाँगविरुद्ध 193 धावा केल्या आणि श्रीलंकेने अफगाणिस्तानच्या 175 धावांचा पाठलाग केला.

दुखापत झालेला रिझवान या सामन्यात खेळताना दिसणार आहे

रविवारी भारताविरुद्ध दुखापत झालेला रिझवानही या सामन्यात दिसणार आहे. त्याला वैद्यकीय पथकाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तो टॉप ऑर्डर बॅटिंग आणि विकेट किपिंगमध्ये आपले स्थान कायम राखेल.

संभाव्य प्लेइंग XI

पाकिस्तान : बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन.

अफगाणिस्तान : 1. हजरतुल्ला झझाई, 2. रहमानउल्लाह गुरबाज, 3. इब्राहिम जद्रान, 4. मोहम्मद नबी, 5. नजीबुल्लाह जद्रान, 6. करीम जनात, 7. रशीद खान, 8. अजमातुल्ला उमरझाई, 9. नवीन-उल-हक, 10. मुजीब उर रहमान, 11. फल्हक फारुकी.

बातम्या आणखी आहेत...