आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी क्रिकेट:पाकिस्तान - ऑस्ट्रेलियाची सलग दुसरी कसोटी अनिर्णीत, शेवटची कसोटी 21 मार्चला होईल

कराची2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानचा सलग दुसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. ३ कसोटी सामन्यांची मालिका ०-० अशी आहे. शेवटची कसोटी २१ मार्चला सुरू होईल. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानने दुसऱ्या डावात २ बाद १९२ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. सामना संपेपर्यंत संघाने ७ बाद ४४३ धावा काढल्या. संघाला विजयासाठी ५०६ धावांचे आव्हान मिळाले होते. सामनावीर ठरलेल्या कर्णधार बाबर आझमचे (१९६) दुहेरी शतक हुकले. ही त्याची कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली, तर मोहंमद रिझवानने (१०४) नाबाद शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा (३०१) हा दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३००+ धावा करणारा एकमेव खेळाडू बनला. १९५६ पासून दोन्ही संघांमध्ये ६८ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये २० वा सामना अनिर्णीत राहिला. पाकिस्तानने १५, तर ऑस्ट्रेलियाने ३३ सामने जिंकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...