आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी-20 वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या षटकारांवर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस राउफने प्रतिक्रिया दिली आहे.
29 वर्षीय वेगवान गोलंदाजाने क्रिकविकवर माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आणि म्हटले- 'जसा कोहली वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. तोच त्याचा क्लास आहे. तो कोणत्या प्रकारचे फटके खेळतो आणि माझ्या चेंडूवर षटकार कसा मारतो हे सर्वांनाच माहीत आहे.
मला वाटत नाही की असा षटकार मारणारा दुसरा खेळाडू कोणी असले. दिनेश कार्तिकने फटका मारला असता किंवा हार्दिक पंड्याने फटका मारला असता तर मला वाईट वाटले असते. पण, कोहलीने मारले, त्याचा मला दुख नाही कारण की त्याचा वेगळा क्लास आहे.
23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमधील भारत-पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने हारिस राउफच्या चेंडूवर 2 षटकार मारून सामन्याचा रोख बदलला होता आणि भारताला हरलेला सामना जिंकण्यास मदत केली होती. 19व्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवर हे षटकार लागण्यापूर्वी भारताला विजयासाठी 8 चेंडूत 28 धावांची गरज होती.
कोहलीने लिहिले - 23 ऑक्टोबर 2022 माझ्या हृदयात नेहमीच खास असेल
कोहलीने ती खेळी स्वत:साठी संस्मरणीय असल्याचे सांगितले होते. विराटने 26 नोव्हेंबरला एका सोशल पोस्टमध्ये लिहिले- '23 ऑक्टोबर 2022 माझ्या हृदयात नेहमीच खास असेल. क्रिकेटच्या खेळात इतकी ऊर्जा यापूर्वी कधीच जाणवली नव्हती. किती छान संध्याकाळ होती...' खाली कोहलीची पोस्ट पहा..
कोहलीच्या षटकारांना मिळाली वाहवाही आणि टाळ्या
कोहलीच्या 2 षटकारांवर टाळ्यांचा वर्षाव झाला. विशेषतः,तो षटकार. जो कोहलीने राउफच्या लेन्थ बॉलवर पुढच्या दिशेने मारला. या षटकारांनी चाहत्यांना आणि माजी क्रिकेटपटूंना चकित केले होते. नंतर या दोन्ही शॉट्सचे खूप कौतुक झाले. बघा, त्या सामन्याच्या शेवटच्या षटकाचा थरार//
कोहलीची 53 चेंडूत 82 धावांची खेळी
या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 82 धावांची अप्रतिम खेळी केली. 53 चेंडूंच्या या खेळीत विराटने 154.71 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 जबरदस्त षटकारांचा समावेश होता. ग्राफिकमध्ये पहा विराट कोहलीची ती खेळी.
भारताने 4 गडी राखून मिळवला विजय
टीम इंडियाने तो सामना 4 विकेटने जिंकला आणि टी-20 वर्ल्ड कपची विजयाने सुरुवात केली. त्या अत्यंत रोमांचक सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे टीम इंडियाने 20 षटकात 6 विकेट्स गमावून पूर्ण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.