आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला विश्‍वचषक:पाकची कर्णधार महरूफ बाळंतपणानंतर अवघ्या ४५ दिवसांत मैदानावर!

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत सध्या सात महिन्यांच्या मुलीसह सहभागी झालेली पाकिस्तान संघाची कर्णधार महरूफ अधिकच चर्चेत अाली अाहे. भारताविरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान तिची क्रिकेटबाबतची धडपड समाेर अाली. यासाठी तिने अापल्या तान्हुल्या मुलीला कडेवर घेऊन क्रिकेटचे मैदान गाठले. या सामन्यादरम्यान महरूफच्या चिमुकल्या मुलीसाेबत खेळतानाच भारतीय महिला संघातील खेळाडूंचाही व्हिडिअाे व्हायरल झाला. याच विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सहा माॅम क्रिकेर्ट्स अाता चर्चेचा विषय ठरत अाहेत. यामध्ये महरूफसह न्यूझीलंडची सेटर्थवेट, ली ताहुहू, अाॅस्ट्रेलियाची मेगन शाॅट, राचेल हेन्स अाणि दक्षिण अाफ्रिकेच्या लिजेलचा समावेश अाहे. कर्णधार बिस्माह महरूफने बाळंतपणानंतर अवघ्या ४५ दिवसांत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. तिने लाहाेरच्या हाय परफाॅर्मन्स सेंटर गाठले. याठिकाणी तिने कसून सराव केला. यातून तिला वर्ल्डकपसाठी संघातील स्थान निश्चित केले.

पीसीबीची महिला क्रिकेटपटूंसाठी खास सुविधा : पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) अापल्या महिला खेळाडूंसाठी २०२१ मध्ये खास सुविधा असलेली याेजना जाहीर केली. यातून पीसीबीने गतवर्षी मॅटर्निटी लिव्हची याेजना जाहीर केली.

बातम्या आणखी आहेत...