आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Pakistan Cricket Board Salary Of Pakistani Players Increased By 250 Times; PCB Chief Rameez Raja Said – Bilateral Series With India Is Not Possible; News And Live Updates

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पगारात 250 टक्क्यांनी वाढ:देशात आर्थिक संकटाच्या दरम्यान पीसीबीने केली घोषणा, महिन्याला मिळणार 1.4 लाख ते 2.5 लाख रुपये मिळणार पगार

लाहोर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीसीबीने म्हटले - संघातील स्थानाची चिंता करू नका, मुक्तपणे खेळा

पाकिस्तान देश सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परंतु, गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमधील क्रिकेट खेळाडूंच्या वेतनात 250 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पगार वाढीचा सर्वात मोठा फायदा ग्रुप डी च्या खेळाडूंना होणार आहे. आधी पाकिस्तानी खेळाडूंना महिन्याला 40 हजार रुपये म्हणजे भारतीय रुपयांत 17 हजार रुपये मिळत होते. आता त्यांच्या वेतनात एक लाख रुपयाने वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी खेळाडूंना एक लाख 40 हजार रुपये मिळतील.

प्रत्येक खेळाडूच्या पगारात एक लाखांची वाढ
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवे प्रमुख रमीज राजा म्हणाले की, घरगुती खेळाडूंच्या पगारामध्ये 1 लाख रुपयांची वाढ त्वरित लागू करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, देशातील 192 क्रिकेटपटूंना याचा लाभ मिळणे सुरु झाले आहे. यासोबतच, आता प्रथम श्रेणी आणि ग्रेड स्पर्धांचे क्रिकेटपटू देखील दरमहा 1.4 लाख ते 2.5 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. तर दुसरीकडे, ग्रेड ए खेळाडूंसाठी 13.75 लाखांऐवजी 14.75, ग्रेड बी खेळाडूंसाठी 9.37 लाखांऐवजी 10.37 लाख रुपये आणि ग्रेड सी खेळाडूंना 6.87 लाख ऐवजी 7.87 लाख पाकिस्तानी रुपये मिळणार आहे.

पीसीबीने म्हटले - संघातील स्थानाची चिंता करू नका, मुक्तपणे खेळा
पीसीबी प्रमुख पुढे म्हणाले की, राष्ट्रीय क्रिकेटपटूंनी कोणताही संकोच न बाळगता क्रिकेट खेळायला हवे. वेळप्रसंगी समस्यांना सामोरे जाण्यासाठी आणि सामने गमावण्यासही तयार असले पाहिजे. खेळाडूंनी संघातील त्यांच्या स्थानाची चिंता न करता निर्भयपणे खेळायला हवे असे ते म्हणाले.

टी -20 विश्वचषकात समीकरण बदलेल
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यावर रमीज राजा म्हणाले की, मी संघातील खेळाडूंना भेटलो असून यावेळी संघातील समीकरण बदलण्यास सांगितले आहे. भारतासोबतच्या सामन्यासाठी संघ 100 टक्के सज्ज असावा आणि त्यांनी चांगली कामगिरी करावी# सध्याच्या परिस्थितीत भारतासोबत द्विपक्षीय मालिका शक्य नाही. राजकारणाचा खेळांवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही घाई योग्य राहणार नाही रमीज राजा यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...