आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमवर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडिताने पत्रकार परिषदेत म्हटले की, बाबने लग्नाचे आमिष देऊन 10 वर्षांपर्यंत तिचे लैंगिक शोषण केले. गर्भवती झाल्यानंतर बाबरने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिले असाही आरोप या महिलेने केला आहे. ही पत्रकार परिषद पाकिस्तानी वृत्त वाहिनी '24 न्यूज HD' ने दाखवली.
पाकिस्तानी मीडियाने मुलीचे नाव हामीजा सांगितले आहे. पीडितेने म्हटले की, "बाबर आणि मी एकाच शाळेत शिकत होतो. आम्ही एकाच भागात राहत होतो. त्याने मला प्रपोज केले आणि मी स्वीकारले होते. त्यावेळी त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली नव्हती."
So this lady has made accusations against Babar Azam "he promised to marry me, he got me pregnant, he beat me up, he threatened me and he used me"
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) November 28, 2020
Video courtesy 24NewsHD pic.twitter.com/PTkvdM4WW2
2011 मध्ये कोर्ट मॅरेज करण्यासाठी घरातून पळालो
पीडितेने सांगितले की, "जसजसा वेळ पुढे गेला, तसतसे आम्ही लग्नाविषयी योजना आखू लागलो. आम्ही आमच्या कुटुंबियांना याविषयी सांगितले पम त्यांनी नकार दिला. त्यामुळे 2011 मध्ये आम्ही घरातून पळालो. बाबर मला नेहमी म्हणायचा की आपण कोर्टात लग्न करू. आम्ही या काळात गुलबर्ग आणि पंजाब हाउसिंग सोसाइटीत रेंटवर राहिलो, पण त्याने माझ्याशी लग्न केले नाही."
पाकिस्तान संघात निवड झाल्यानंतर बाबरची वागणूक बदलली
हामीजाने म्हटले की, तिने अनेकवेळा बाबरचा खर्च देखील उचलाल होता. 2014 मध्ये राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर बाबरची वागणूक बदलत गेली. पुढील वर्षी मी त्याला लग्नाविषयी विचारले असता त्याने पुन्हा एकदा नकार दिला.
2015 मध्ये गेले होते दिवस, जीवे मारण्याची दिली धमकी
हामीजाने सांगितले की, "2015 मध्ये मी गर्भवती असल्याचे बाबरला सांगितले. यावर त्याची वेगळीच प्रतिक्रिया होती. त्याने माझे शारिरीक शोषण केले. मी माझ्या घरी परत जाऊ शकत नाही, कारण आम्ही घरातून पळून आलो होतो आणि कुटुंबियांचा माझ्यावरील विश्वास उडाला होता."
2017 मध्ये केला गर्भपात
हामीजाने सांगितले की, "बाबरने त्याच्या काही मित्रांसोबत मिळून माझा गर्भपात केला. ती म्हणाली की, ''2017 मध्ये मी नासिराबाद पोलिस ठाण्यात बाबरविरोधात तक्रार दाखल केली. तो पोलिस ठाण्यात तर आला नाही. उलट प्रकरण मिटवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकत होता."
बाबरने 2017 मध्ये फोन नंबर बदलला
हामीजाने पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर हा साक्षीदार असल्याचे सांगितले. ''ती म्हणाली की, 2017 मध्ये बाबरने फोन नंबर देखील बदलला. यानंतर 3 वर्षांपर्यंत तो माझा फायदा घेत होता. 2020 मध्ये त्याने माझ्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.''
बाबर तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार
नुकताच बाबरला पाकिस्तान क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार म्हणून नेमण्यात आले. याआधी तो एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत 29 कसोटी सामने खेळले असून त्यात 45.44 च्या सरासरीने 2045 धावा केल्या आहे. तर 77 एकदिवसीय सामन्यात त्याने 55.94 च्या सरासरीने 3,580 धावा केल्या आहेत. बाबरने 44 टी-20 सामन्यांत 50.94 च्या सरासरीने 1,681 धावा केल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.