आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हम आपको हमारे किंग बाबर आझम से...':पाकिस्तानातील चाहत्यांचा विराट कोहलीला खास संदेश...पाहा हा व्हायरल फोटो

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. कोहलीचे चाहते फक्त भारतापुरते मर्यादित नाहीत तर जगभरात त्याचे चाहते आहेत. या दिग्गज खेळाडूला आपल्या संघाविरुद्ध खेळताना पाहण्यासाठी इतर देशांतील चाहतेही नेहमीच उत्सुक असतात. पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात मुलतानमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी अशीच एक घटना बघायला मिळाली. ज्यामध्ये विराटचे दोन चाहते कोहलीला आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्याची विनंती करताना दिसले.

विराट कोहली सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या तिसर्‍या वनडे सामन्यात त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 72 वे शतकही ठोकले. उजव्या हाताचा हा फलंदाज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100 शतकांचा विक्रम पूर्ण करण्याच्या एक पाऊल जवळ गेला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे आणि उभय देशांमध्ये तणाव सुरू असल्यानेे भारताला पाकमध्ये खेळण्याची परवानगी मिळणार की नाही हा प्रश्न दोन्हीकडील चाहत्यांना पडला आहे. अशातच दोन पाकिस्तानी क्रिकेट चाहते कोहलीला पाकिस्तानात येण्याची विनंती करताहेत.

खरं तर, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मुलतानमध्ये खेळला गेला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थित दोन चाहते हातात कार्ड घेऊन दिसले ज्यावर त्यांनी विराट कोहलीसाठी खास संदेश लिहिले होते.

पहिल्या कार्डावर लिहिले होते...

हाय, किंग कोहली. पाकिस्तानला आशिया चषक खेळण्यासाठी ये

आणि दुसऱ्या कार्डवर असे लिहिले होते...

आम्ही तुला आमच्या किंग बाबर आझम पेक्षाही तुला जास्त प्रेम देऊ

टीम इंडिया आशिया कप 2023 खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही

विशेष म्हणजे आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक 2023 पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी भारत पाकिस्तानला जाणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे.

या स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाणाची गरज असल्याचेही शाह म्हणाले होते.तर PCB चेअरमन रमीझ राजा हे अनेक दिवसांपासून BCCI च्या या मागणीला विरोध करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...