आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराT-20 वर्ल्डकपमध्ये गुरुवारी सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव झाला. इंग्लंडकडून टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव झाला, यामुळं भारत या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. यावर टीम इंडियावर चाहते संतापले असून सर्वस्तरातून टीम इंडियावर टीका सुरू आहे.
त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही ट्विट करत भारताची खिल्ली उडवली आहे. त्यांनी ट्विट करत टीम इंडियाला टार्गेट करत भारताला डिवचण्याची संधी सोडली नाही.
टीम इंडियाचा पराभव करून इंग्लंड अंतिम सामन्यात पोहोचली आहे. तिथे त्याची फायनल लढत पाकिस्तान टीम बरोबर होणार आहे. पाकिस्तानना नशीबाने साथ दिल्यानेच सुपर लढतीतच बाहेर पडण्याची शक्यता असणाऱ्या पाकला अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी मिळाली.
पाकने सेमीफायनलमध्ये न्युझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात पाकिस्तानची सलामी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी दमदार खेळी करत अर्धशतके ठोकली आणि पाकिस्तानने सहज सामना जिंकला. पाकिस्तानने 13 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.
पण गुरूवारी टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्वीट करत म्हटलं की, "तर आता या रविवारी 152/0 आणि 170/0 या दोघांमध्ये फायनल होणार आहे" आता हे ट्वीट कदाचित तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही.
कारण गुरूवारी झालेल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरावे लागले. त्यानंतर टीम इंडियाने 6 गडी बाद 168 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडनं फलंदाजी करताना एकही गडी न गमावता 170 धावा करत टीम इंडियावर एकहाती विजय मिळवला. त्यानंतर भारताचं या वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं.
गेल्यावर्षी UAE मध्ये T-20 विश्वचषक पार पडला होता. यामध्ये पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. त्यावेळी दुबईत झालेल्या या सेमी फायनलमधील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्ताननं एकही गडी न गमावता 152 धावा ठोकल्या होत्या.
त्यामुळं गेल्यावर्षी पाकिस्ताननं भारताचा केलेला पराभव आणि आत्ता इंग्लंडनं यावेळी टीम इंडियाचा केलेला पराभव या दोन्हींचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतीय संघाची खिल्ली उडवली आहे..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.