आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तान सुपर लीग (PSL) च्या पहिल्या पात्रता सामन्यात मुल्तान सुल्तान संघाने लाहोर कलंदर्सचा 84 धावांनी पराभव केला. मुल्तान सुल्तानसाठी पोलार्डने तुफानी खेळी खेळली आणि 34 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांसह 57 धावा केल्या. किरॉन पोलार्डच्या दमदार खेळीमुळे मुल्तानचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 160 धावा करू शकला, तर लाहोरचा संघ 14.3 षटकात केवळ 76 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे मुलतान सुल्तानचा संघ PSL 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
पोलार्डला मुल्तान सुल्तानमध्ये शानदार खेळी खेळताना पाहायला मिळाली आणि त्याला प्लेअर ऑफ द मॅचने गोरविले गेले. पण सामन्यादरम्यान स्फोटक फलंदाज पोलार्ड ज्या चेंडूवर बोल्ड झाला तो चेंडू ताशी 154 किमी वेगाने टाकला गेला होता.
हा चेंडू पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस राउफने टाकला होता. हारिसने आतापर्यंतच्या कारकिर्दीत टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू होता. खरेतर, डावाच्या 20व्या षटकात हॅरिसने पोलार्डकडे टाकलेला तिसरा चेंडू इतका वेगवान होता की, शॉट मारण्याच्या प्रयत्नात पोलार्डचा वेळ चुकला, जो थेट स्टंपला लागला. स्टंप हवेत खूप दूरपर्यंत उडाला. जेव्हा भरधाव वेगाने फेकलेला चेंडू स्टंपवर आदळला तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते.
चेंडू स्टंपला लागताच विकेट हवेत दोन तीन कोलांटी खात हवेत उडाली आणि मग जमिनीवर पडली. पोलार्डही या अति वेगाने आलेल्या चेंडूला पाहुन हैराण झाला, तर पोलार्ड बाद झाल्यानंतर राउफ विकेट मिळाल्याचा आनंद साजरा करताना दिसला.
लाहोरचा संघ हा सामना वाचवू शकला नसला तरी आता एलिमिनेटर फेरीत लाहोरच्या संघाचा सामना दुसऱ्या पात्रता सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरणाऱ्या संघाशी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.