आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Pakistan Tour Of Netherlands; Netherlands Vs Pakistan, Babar Azam, Haris Rauf, Babar's Half centuries Hat trick: 8th Fifties In 9 Matches, 4 Of Them Centuries; Pakistan Won By 7 Wickets In The Second ODI

बाबरची अर्धशतकांची हॅटट्रिक:9 सामन्यांमध्ये 8 वे अर्धशतक, त्यापैकी 4 शतके; दुसऱ्या वनडेत पाकिस्तानचा 7 गडी राखून विजय

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. गुरुवारी नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 57 धावा केल्या. या खेळीसह पाकिस्तानने 7 गडी राखून विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांनी 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

रॉटरडॅममध्ये पाकिस्तानने प्रथम नेदरलँड्सला 44.1 षटकात अवघ्या 186 धावांवर रोखले. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा 33.4 षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात केल्या. बाबर आझमने गेल्या 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 वे अर्धशतक झळकावले आहे.

यापैकी 4 शतके झाली आहेत. गेल्या 16 पैकी 14 सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली आहेत. बाबरने 65 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या.

रउफ-नवाझने नेदरलँडचे मोडले कंबरडे

मोहम्मद नवाज सामनावीर ठरला. त्याने 42 धावांत 3 बळी घेतले.
मोहम्मद नवाज सामनावीर ठरला. त्याने 42 धावांत 3 बळी घेतले.

यजमानांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण पाकिस्तानी गोलंदाज हरिस रउफ आणि मोहम्मद नवाज (प्रत्येकी 3 बळी) यांनी तो निर्णय चुकीचा ठरवत संघाचे टॉप-3 फलंदाज अवघ्या 8 धावांत बाद झाले.

यानंतर बास डी लीड (89) आणि टॉम कूपर (66) यांनी चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. नवाजने ही भागीदारी 117 धावांवर मोडली, याठिकाणी कूपर आउट झाल्यानंतर पाहता पाहता संपूर्ण संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.

पाकचे सलामीवीर 11 धावांवर माघारी परतले

पाकचा सलामीवीर इमाम-उल-हक 6 धावा काढून बाद झाला.
पाकचा सलामीवीर इमाम-उल-हक 6 धावा काढून बाद झाला.

फखर जमान 3 आणि इमाम उल हक वैयक्तिक 6 धावांवर बाद झाले. पाकिस्तानने 11 धावांत दोन्ही सलामीवीर गमावले होते. कर्णधार बाबर आझमसह मोहम्मद रिझवानने तिसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली.

बाबर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या आघा सलमानने शेवटपर्यंत रिझवानला साथ देत संघाला विजयापर्यंत नेले. रिझवानने 69, तर सलमानने 35 चेंडूत 50 धावांची नाबाद खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...