आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 657 धावांवर आटोपला. इंग्लिश संघाने अवघ्या 101 षटकांत एवढी मोठी धावसंख्या उभारली.
हॅरी ब्रूकने सर्वाधिक 153 धावांची खेळी केली. पहिल्या दिवसाच्या 4 बाद 506 धावांच्या पुढे खेळताना इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 6 विकेट गमावून 151 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानकडून पहिला कसोटी सामना खेळत लेगस्पिनर जाहिद महमूदने सर्वाधिक 4 बळी घेतले. नसीम शाहने 3 तर मोहम्मद अलीने 2 बळी घेतले. हरिस राउफला 1 यश मिळाले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात उपाहारापर्यंत एकही विकेट न गमावता 17 धावा केल्या. इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक नाबाद आहेत.
ब्रूकने दुसऱ्या दिवशीच्या डावात जोडल्या 52 धावा
दुसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात नसीम शाहने बेन स्टोक्सला बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टोक्सने 18 चेंडूत 41 धावा केल्या. बोल्ड होण्यापूर्वी स्टोक्सने नसीमच्या चेंडूवर षटकारही मारला. स्टोक्स बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन (9) देखील नसीम शाहचा बळी ठरला.
ब्रूकने दुसऱ्या दिवशी आपली धावसंख्या 52 धावांनी वाढवली. त्याची विकेटही नसीमने घेतली. यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये विल जॅक्सने 30 आणि ऑली रॉबिन्सनने 37 धावा केल्या. जॅक लीच 6 धावा करून नाबाद राहिला.
इंग्लंडचा रन रेट 6.50 होता
इंग्लंडने त्यांच्या डावात प्रति षटक 6.50 धावा या दराने फलंदाजी केली. पाकिस्तानकडून गोलंदाजी करणाऱ्या 6 पैकी 4 गोलंदाजांची इकॉनॉमी 6 पेक्षा जास्त होती. हरिस राउफने 13 षटकात 78 धावा दिल्या. जाहिद महमूदने 33 षटकात 235 धावा दिल्या. आघा सलमानने 5 षटकांत 38 धावा आणि साउद शकीलने 2 षटकांत 30 धावा दिल्या.
पाकिस्तानच्या दोन स्ट्राईक गोलंदाजांची स्थिती थोडी बरी होती. नसीम शाहने 24 षटकात 140 धावा दिल्या. त्याची इकॉनॉमी 5.83 होती. तर मोहम्मद अलीने 24 षटकात 124 धावा दिल्या. त्याची इकॉनॉमी 5.16 होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.