आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतावर नाराजी व्यक्त करण्याच्या नादात पाकिस्तान सरकारने आपल्याच देशातील क्रिकेट चाहत्यांना शिक्षा दिली आहे. 8 जुलैपासून इंग्लंडमध्ये होत असलेली ENG-PAK क्रिकेट सिरीज पाकिस्तानातील कोणत्याही टीव्ही चॅनलवर दाखवली जाणार नाही, कारण दक्षिण आशियात क्रिकेट मॅच दाखवण्याचे सर्व हक्क भारतीय कंपनी सोनी आणि स्टारकडे आहेत.
पाकिस्तान टीव्हीने आपल्या सरकारला भारतीय कंपन्यांशी करार करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. जेणेकरुन पाकिस्तानी प्रेक्षकदेखील सामन्याचा आनंद घेऊ शकतील, परंतु सूचना मंत्री फवाद चौधरी म्हणाले, "पीटीव्हीची विनंती फेटाळून लावण्यात आली आहे. जोपर्यंत भारत 5 ऑगस्ट 2019 रोजी केलेल्या (कलम 370) कार्यवाहीवर पुनर्विचार करत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी करार होणार नाही."
सामना पाकिस्तानचा असताना, पाकिस्तानमध्येच तो दाखवण्यासाठी भारताबरोबर कराराची काय गरज आहे? वास्तविक, हे प्रकरण टीव्ही चॅनेलच्या अधिकारांशी संबंधित आहे. हजारो कोटी रुपये यात लागले आहेत. प्रत्येक सामना दाखवण्यासाठी टीव्ही चॅनेलला 50-70 कोटी रुपये द्यावे लागतात. चला हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया...
क्रिकेटचे हक्क काय आहेत?
लाईव्ह क्रिकेट टीव्हीवर दाखवण्यासाठी चॅनेलला क्रिकेट बोर्डांना पैसे द्यावे लागतात. याला हक्क खरेदी करणे असे म्हणतात. बोर्ड्स सरासरी पाच वर्षे सामने दाखवण्याचे अधिकार विकतात. प्रत्येक देशात जिथे क्रिकेट आहे तिथे एक बोर्ड राहते. उदाहरणार्थ, आपल्याकडे भारतीय क्रिकेट बोर्डा म्हणजेच BCCI, पाकिस्तानमधील PCB, इंग्लंडमधील ECB, ऑस्ट्रेलियामधील CA, दक्षिण आफ्रिकेत CSA बोर्ड आहे.
हे बोर्ड त्यांचे घरगुती आणि जागतिक हक्क विकतात. जसे BCCIने आपल्या देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आणि IPL चे हक्क स्टार स्पोर्ट्सला विकले आहेत. जे देश आपल्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी येतात त्या देशातील चॅनलला BCCI कडून ग्लोबल राईट घ्यावे लागतात.
सोनी आणि स्टार स्पोर्ट्सने संपूर्ण जगातील क्रिकेट बोर्ड्सकडून दक्षिण आशियातील ग्लोबल हक्क विकत घेतले आहेत. जर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका देशातील संघ इतर कोणत्याही देशात क्रिकेट खेळण्यासाठी गेल्यास त्यांना स्टार किंवा सोनीशी करार करावा लातो. सध्या पाकिस्तानने हा करार करण्यास नकार दिला आहे. म्हणूनच इंग्लंडमध्ये होणारा सामना पाकिस्तानमध्ये दाखवला जाऊ शकत नाही.
स्थानिक बोर्डाकडून देशांतर्गत हक्क आणि ग्लोबल हक्क याशिवाय काही हक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच ICC कडून विकत घ्यावे लागतात. जसे- विश्वचषक, टी -20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा चालू असलेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. हे सामने दाखवण्यासाठी कोणत्याही चॅनेलला आयसीसीकडून अधिकार घ्यावे लागतील.
तीन प्रकारे क्रिकेट राईट्सची बोली लावली जाते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.