आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Pakistan Vs New Zealand Tour Cancelled Update | NZ Team Call Off Pakistan Tour Minutes Before First ODI; News And Ilve Updates

​​​​​​​न्यूझीलंडने रद्द केला पाकिस्तानचा दौरा:पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटांपूर्वी घेतला निर्णय, पाक पंतप्रधानांचे प्रयत्नही ठरले अपयशी

रावळपिंडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी साधला होता संवाद

न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. रावळपिंडी येथे सुरु होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या केवळ 30 मिनिटांपूर्वी किवी क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघामध्ये 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिकाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, सुरक्षेचे कारण देत न्यूझीलंडने हा दौरा रद्द केला आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्तचर सूचना मिळाली होती. यामुळे आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची तयारी केली जात आहे.

इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी साधला होता संवाद
पाकिस्तान आणि न्यूझीलंडमधील ही मालिका पुर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. यासाठी खुद पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांना फोन करून सुरक्षेचे पूर्ण आश्वासन दिले होते. पाकिस्तानकडे जगातील सर्वोत्तम गुप्तचर यंत्रणा असून किवी संघाला कोणताही धोका नाही असे इम्रान खान म्हणाले होते. परंतु, त्यांचे हे आश्वासन कामात आले नाही. अखेर सुरक्षेचे कारण देत न्यूझीलंड सघाने हा दौरा रद्द केला आहे.

हॉटेलच्या बाहेर आले नाहीत दोन्ही संघ
पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार होता. सामन्याची नाणेफेक दुपारी 2.30 वाजता होणार होती. परंतु, नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघातील कोणतेही खेळाडू बाहेर पडले नाहीत. विशेष म्हणजे यावेळी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना हॉटेलमध्येच राहण्यास सांगण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...