आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Pakistan Vs Sri Lanka Asia Cup Final; Discrimination Against Indian Fans In Asia Cup Final: Denied Entry Into Stadium For Wearing Indian Jersey, Told To Wear Pak Jersey

आशिया कप फायनलमध्ये भारतीय चाहत्यांशी भेदभाव:इंडियन जर्सी घातल्यामुळे स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला, म्हणाले, पाकची जर्सी घालून या

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांशी भेदभाव केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यापासून भारतीय चाहत्यांना रोखण्यात आले. कारण चाहत्यांनी भारतीय जर्सी परिधान केली होती. एवढेच नाही तर भारतीय चाहत्यांना श्रीलंका किंवा पाकिस्तानची जर्सी घालण्याची सक्ती करण्यात आली.

टीम इंडियाला सपोर्ट करणाऱ्या 'भारत आर्मी' या फॅन क्लबच्या सदस्याने रविवारी दावा केला की, त्याला आणि इतर दोन चाहत्यांना भारतीय जर्सी घातल्यामुळे स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात आली नाही. 'भारत आर्मी'ने ट्विटरवर लिहिले की, 'आम्ही आणि इतर भारतीय क्रिकेट चाहते टीम इंडियाची जर्सी घालून मॅचला जाऊ शकत नाही, हे आमच्यासाठी अतिशय धक्कादायक वागणूक होती.'

ICC आणि ACC ला टॅग करत त्याने लिहिले - आमचे काही सदस्य आशिया कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी गेले होते. तेथे स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी त्यांना सांगितले की, तुम्ही स्टेडियममध्ये जाऊ शकत नाही. ते आमच्याशी वाईट वागलेत. आम्ही तुम्हाला विनवणी करतो. यानंतर त्याने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

एजबॅस्टनच्या कसोटी दरम्यान सुद्धा झाले होते गैरवर्तन

भारतीय चाहत्यांशी गैरवर्तन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीत भारतीय चाहत्यांशी गैरवर्तन करण्यात आले होते.

5व्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंड टीमच्या चाहत्यांनी भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पणी केली होती. नंतर ECB ने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि त्याचा तपास केला आणि स्थानिक पोलिसांनी आरोपी चाहत्यांना अटकही केली होती.

काय आहे भारत आर्मी?

'भारत आर्मी' हा टीम इंडियाच्या चाहत्यांचा ग्रुप आहे. जो टीम इंडियाला फॉलो करतो आणि त्याचे देश-विदेशातील सामने बघायला जातो. हा गट 1999 मध्ये स्थापन झाला.

टीम इंडिया सुपर-4 टप्प्यातून बाहेर

आशिया कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर रोहित आर्मी सुपर-4 च्या टप्प्यातून बाहेर पडला होता. सुपर-4 फेरीत त्याने तीनपैकी एक सामना जिंकला आणि 2 मध्ये पराभूत झाला. संघाचे 2 गुण होते. साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकून त्याने सुपर-4 मध्ये प्रवेश केला होता

बातम्या आणखी आहेत...