आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टी-20 विश्वचषक :विनाप्रेक्षक विश्वचषकाचे आयोजन करू नये : वसीम अक्रम

कराचीएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 10 जूनला आयसीसीचा बैठकीत टी-20 वर्ल्डकप आयोजनावर निर्णय

पाकचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम विनाप्रेक्षक टी-२० आयोजनाच्या बाजूने नाही. त्याच्या मते, आयसीसीने स्पर्धेच्या आयोजनासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करायला हवी. काेरोनामुळे ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेेंबरमध्ये होणारा टी-२० विश्वचषक स्थगित केला जाऊ शकतो. अक्रमने म्हटले की, ‘ मला हे योग्य वाटत नाही. विनाप्रेक्षक विश्वचषक कसे होऊ शकते. विश्वचषकाचा अर्थ आहे, खचाखच भरलेले स्टेडियम. चाहते संघाच्या समर्थनार्थ येतात. या गोष्टी सांगतात की, विनाप्रेक्षक वातावरण कसे राहील. आयसीसीच्या १० जून रोजी बैठकीत विश्वचषकावर निर्णय होऊ शकतो.


या संकटातही मालिका आयाेजनाची तयारी : ईसीबी

लंडन | वेस्ट इंडीजसोबत कसोटी मालिकेदरम्यान या संकटावर मात करण्यात तयार आहोत, असे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) म्हटले. मंडळाचे संचालक स्टीव्ह एलवर्दी म्हणाले की, आम्ही असे नियोजन केले आहे. इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटीच्या मालिकेला ८ जुलैपासून सुरुवात होत आहे. विंडीज टीम मंगळवारी चार्टर्ड विमानाने येथे दाखल हाेईल.

0