आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबई:पाकचा बाबर दुसऱ्यांदा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराच्या शर्यतीत

दुबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन कसोटी संघांच्या कर्णधारांनी मार्च महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळवले. पाकिस्तानचा बाबर आझम, वेस्ट इंडीजचा क्रेग ब्रॅथवेट आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सची पुरुष गटात निवड झाली.

त्याचबरोबर महिला गटात इंग्लंडची गोलंदाज सोफी एक्लेस्टोन, ऑस्ट्रेलियाची रॅचेल हेन्स आणि द. आफ्रिकेच्या लॉरा वोल्वॉर्टला नामांकन देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात विजेत्याची घोषणा केली जाईल. बाबरला दुसऱ्यांदा नामांकन मिळाले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याने पुरस्कार जिंकला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत त्याने ३९० धावा केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...