आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान Vsन्यूझीलंड कसाेटी:पाकच्या शकीलचे पहिले शतक, न्यूझीलंडविरुद्ध कसाेटीत शकीलच्या 124 धावा

कराचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान पाकिस्तान संघाच्या २७ वर्षीय फलंदाज साैद शकीलने बुधवारी घरच्या मैदानावर पाहुण्या न्यूझीलंड टीमविरुद्ध नाबाद १२४ धावांची खेळी केली. यासह त्याने आपल्या करिअरमध्ये पहिल्या कसाेटी शतकाची नाेंद केली. याशिवाय त्याने पाच कसाेटींतून ५०० धावा पूर्ण केल्या आहेत. याच शतकाच्या बळावर पाकिस्तान संघाने दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात ९ बाद ४०७ धावा काढल्या आहेत. पाक संघाकडून आता शकील आणि अहमद मैदानावर कायम आहेत. अद्याप पाक संघ ४२ धावांनी पिछाडीवर आहे. पाहुण्या न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ४४९ धावा काढल्या आहेत.

पाक संघाने कालच्या ३ बाद १५४ धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. इमाम उल हकने ८३ धावांची खेळी करत पॅव्हेलियन गाठले. शतकाच्या वाटेवर असलेल्या इमामला टीम साऊथीने बाद केलेे.

बातम्या आणखी आहेत...