आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:बीसीसीआयचा अट्टहास कायम; जुलैमध्ये आयपीएलच्या आयाेजनासाठी प्रयत्नशील

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • प्रेक्षकाविना आयपीएल खेळण्यास सर्वात महागडा पॅट कमिन्स उत्सुक

मुंबई - अवघे जग काेराेनाच्या महामारीमुळे संकटात सापडले आहे. त्यामुळे वेगाने हाेत असलेली जीवितहानी राेखण्यासाठी सर्वच देश युद्धपातळीवर कार्यरत आहेत. अशा गंभीर परिस्थितीनंतरही आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे यंदाच्या आयपीएलच्या आयाेजनासाठी प्रयत्नशील आहे. तब्बल चार हजार काेटींचे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय अट्टहासातून जुलैमध्ये आयपीएलचे आयाेजन करण्याची शक्यता आहे. यासाठीच्या तयारीलाही वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यंदाच्या १३ व्या सत्राची आयपीएल लीग जुलैत आयाेजित केली जाण्याची शक्यता नव्याने निर्माण झाली. काेराेनामुळे सध्या भारतामध्ये लाॅकडाऊन आहे. यातूनच आयपीएलच्या आयाेजनाला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागला. त्यामुळे ही स्पर्धा दाेन आठवड्यांपर्यंत स्थगित झाली.

प्रेक्षकाविना आयाेजनालाच पसंती : गर्दी टाळण्याचे आदेश सर्वांनाच दिले जात आहे. अशात काेराेनाच्या भीतीतून चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी बीसीसीआयने नवीन शक्कल लढवली. यातूनच प्रेक्षकांविना आयपीएल आयाेजनाला पसंती दिली. हा पर्याय असल्याचे बीसीसीआयचे मत आहे.

पावसाचे सावट : बीसीसीआय जुलैत आयपीएल आयाेजनासाठीचे इमले बांधत आहे. याच दरम्यान भारतामध्ये पाऊस असताे. त्यामुळे सामन्यावर पावसाचे सावट असेल.

प्रेक्षकाविना आयपीएल खेळण्यास सर्वात महागडा पॅट कमिन्स उत्सुक

नवी दिल्ली | आपण प्रेक्षकाविना यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रीया सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्सने दिली. आयपीएलच्या इतिहासात हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर साडे १५ काेटींची बाेली लागली. त्याला काेलकाता संघाने खरेदी केले.

बातम्या आणखी आहेत...