आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:चेंडूच्या चकाकीवर बंदी आणल्यास न खेळलेलेच बरे : पॅट कमिन्स

मेलबर्नएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोरोनानंतर आता चेंडू चमकवण्यास लाळ, घाम लावण्यास मनाईचा विचार

चेंडूच्या चकाकीसाठी लाळ व घामाचा उपयोग करण्यावर बंदी आल्यास आपण न खेळलेले बरे, असे मत कसोटीचा नंबर वन गोलंदाज कमिन्सने व्यक्त केले. कोरोनामुळे आयसीसी चेंडू चमकवण्यासाठी नवा नियम बनवू शकते. लाळ व घामाच्या वापरावर बंदी आणण्यात येईल. ऑस्ट्रेलियाची कंपनी कूकाबूराने मेनासारखा पदार्थ बनवल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने म्हटले की, जर चेंडू चमकवल्यामुळे कोरोनाचा प्रसार होत असेल, तर खेळ न झालेला चांगला. 

कसोटी व प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चेंडूला चमकवण्यास बंदी मला मान्य नाही. मी विचार करतोय, जर आपण अशा परिस्थितीत आहोत, जेथे चेंडू चमकवता येत नाही. सोबतच्या सहकाऱ्याजवळ जाता येत नाही. अशात खेळ सुरू करायला नको. वनडे क्रमवारीत चौथ्या स्थानावरील कमिन्सने म्हटले, त्यावर एक पर्याय असायला हवा, कारण तो खेळाचा एक मोठा भाग आहे. ते लाळ असो किंवा दुसरी कोणती वस्तू. जेपर्यंत आम्हाला चेंडूला चकाकी देण्यासाठी परवानगी देत नाही, तोवर ही समस्या कायम राहील. जर तुम्ही चेंडू चमकवू शकत नाही, तर स्विंग आणि रिव्हर्स स्विंग दोन्हीवर परिणाम होईल. डेव्हिड वॉर्नर देखील कमिन्सच्या बाजूने आहे.

बातम्या आणखी आहेत...