आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषभ पंतची पाठराखण:ऋषभचा मार्ग मोकळा; कोच द्रविडचे पाठबळ, टी-20 वर्ल्डकपपर्यंत ऋषभ संघासोबत : द्रविड

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच कर्णधार ऋषभ पंत आपल्या घरच्या मैदानावरील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेदरम्यान फलंदाजी आणि नेतृत्वात अपयशी ठरला. त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. याच अपयशी खेळीमुळे त्याचे भारतीय संघातील स्थानही अडचणीत सापडल्याची चर्चा होती. मात्र, चर्चेवर पडदा टाकत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची पाठराखण केली.

यंदाच्या सत्रात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत ऋषभ हा भारतीय संघासोबत राहणार, अशा शब्दात द्रविडने ऋषभला पाठबळ दिले. त्यामुळे आता ऋषभचा सत्रातील आगामी मालिकासाठी संघातील प्रवेश निश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताने नुकतीच आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळली आहे. या मालिकेसाठी ऋषभ पंतकडे यजमान संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, ताे या मालिकेदरम्यान नेतृत्व आणि फलंदाजीमध्ये सपशेल अयपशी ठरला. त्याने मालिकेतील पाचही सामन्यांत नाणेफेक गमावली. सुरुवातीच्या दाेन्ही सामन्यांत टीमचा पराभव झाला. तसेच फलंदाजीमध्ये त्याला मालिकेत १०५.४५ च्या स्ट्राइक रेटने ५९ धावा काढता आल्या.

कोचसोबत ऋषभ इंग्लंडमध्ये दाखल : आफ्रिकेविरुद्धची मालिका बराेबरीत राहिल्यानंतर आता ऋषभ पंत हा सोमवारी सकाळीच कोच राहुल द्रविडसोबत इंग्लंडमध्ये दाखल झाला. यादरम्यान त्यांच्यासोबत श्रेयस अय्यरही होता. राेहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया याठिकाणी मालिका खेळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...