आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमसीसीने चेंडूला लाळ लावण्याच्या बंदीचा निर्णय जाहीर केलेला आहे. मात्र, त्याचबराेबर चेंडूला घाम लावण्याची परवानगी नाकारली नाही. त्यामुळे गोलंदाजांसाठी हे महत्त्वाचे आहे. याचा निश्चित असा मोठा फायदा होईल, असा विश्वास ऑस्ट्रेलियन कसाेटी कर्णधार पॅट कमिन्सने व्यक्त केला. साेमवारपासून लाहाेरमध्ये यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसाेटी सामन्याला सुरुवात होणार आहे. याच कसाेटीबाबत कर्णधाराशी दिव्य मराठीने साधलेला खास संवाद.
लाहोरच्या खेळपट्टीला सुमार रेटिंग मिळाली आहे, संघाला काेणती पिच पाहिजे?
मी खेळपट्टी निरखून पाहिली आहे. मागील दाेन कसाेटींपेक्षा ही खेळपट्टी वेगळी आणि चांगली वाटत आहे. यावर वेगवान गोलंदाजांना आपले वर्चस्व राखता येणार असल्याचे वाटते. तसेच रिव्हर्स स्विंगही मिळू शकताे. त्यामुळे याबाबत आमची काेणत्याही प्रकारची नाराजी नाही. यावर आमचा संघ सर्वाेत्तम कामगिरी करेल.
शाॅन टेट व मॅथ्यू हेडन
सध्या पाक टीमसाेबत आहेत, त्यांच्याशी काही चर्चा केली?
नाही. तशी आम्ही काहीही चर्चा केली नाही. ते सध्या वेगळ्या भूमिकेत आहे. त्यामुळे ते त्यांची भूमिका पार पाडत आहेत. आम्ही भेटलाे. मात्र, क्रिकेटवर आमची चर्चा झाली नाही. हा खेळ आहे. त्यामुळे यात कलाटणी देणे आणि विजयश्री खेचून आणणे हे सर्व काही क्षमतेवर अवलंबून आहे.
एमसीसीच्या नव्या निर्णयाबद्दल काय वाटते?
मला वाटत नाही, याचा गोलंदाजांना काेणत्याही प्रकारचा अडसर निर्माण झाला. कारण, लाळ लावण्याची बंदी असली तरीही घाम लावण्यास नकार दिलेला नाही. त्यामुळेच याचा गोलंदाजांना मोठा फायदा होईल. गोलंदाज घामाचा वापर करतील.
तुला आयपीएलमध्ये नेतृत्वाखाली खेळावे लागणार?
आयपीएलबाबत मी प्रचंड उत्साही आहे. त्यामुळे मी देखील याचा कसून सराव केला आहे. यादरम्यान मला युवा कर्णधार श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे. त्याचा स्वभाव चांगला आहे. ताे सातत्याने चर्चा करताे. त्यामुळे त्याचा शांत स्वभाव हा सर्वांना मैत्री करण्यास भाग पाडताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.