आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:काेरोनामुळे खेळाडूंची गोची; देश-विदेशात टी-20 लीग-घरचे सामने खेळू शकत नाहीत

लंडन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे प्रत्येक संघात 10 अतिरिक्त खेळाडूंची निवड, मात्र सामने खेळणार नाही

कोरोनामुळे मार्च ते जुलैदरम्यान क्रिकेट होऊ शकले नाही. ८ जुलै राेजी इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिका सुरू झाली. त्यानंतर इंग्लंडमध्ये सलग आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवले जात आहे. कोरोनामुळे राखीवचा नियम आला. मालिकेदरम्यान एखादा खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या जागी राखीवला संधी मिळेल. त्यामुळे मोठ्या संख्येने राखीव खेळाडू दौऱ्यावर जात आहेत. इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी विंडीजने २५ खेळाडूंना पाठवले होते. नियमित १५ सदस्यीय टीम असून यात १० जण राखीव आहेत. पाकिस्तानने कसोटी सोबत टी-२० च्या खेळाडूंनादेखील इंग्लंडला पाठवले. त्याचे एकूण २९ खेळाडू इंग्लंडला आले.

नव्या खेळाडूंना संधी मिळेल

कोरोनामुळे एक सकारात्मक प्रभाव दिसतोय. इंग्लंडने कसोटी व मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी वेगवेगळ्या टीम निवडल्या. यात जरी तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळणाऱ्याचे नुकसान होत असेल, दुसरीकडे, मात्र नव्या खेळाडूंना संधी मिळतेय. रुट व स्टोक्स सारखे खेळाडू केवळ कसोटी खेळताय.

आमचे चांगले खेळाडू घरच्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत : जस्टिन लँगर

आमची मोठी टीम असेल, कारण बायो सुरक्षेमुळे खेळाडूंना सारखे बदलता येणार नाही. १२ व्या व १३ व्या खेळाडूंना शेफील्ड शील्ड खेळणे कठीण आहे. आमचे अनेक चांगले खेळाडू घरच्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक लँगर यांनी म्हटले.

डिसेंबरमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, आपल्या खेळाडूंवर होणार परिणाम

शोएब मलिक व वहाब रियाज सारख्या टी-२० तज्ज्ञ खेळाडूंचा पाकिस्तान संघात समावेश आहे. त्यामुळे ते सीपीएलमध्ये सहभागी होऊ शकत नाही. बायो सुरक्षित वातावरणामुळे ते मालिका संपल्यानंतरच लीग खेळण्यासाठी विंडीजला जाऊ शकतील. डिसेंबरमध्ये भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. आपल्या २५ ते ३० खेळाडूंना दौऱ्यावर पाठवले जाऊ शकते. दौऱ्यात संघाला कसोटी व वनडे मालिका खेळायची आहे. यात १०-१२ खेळाडूंना ना घरच्या स्पर्धेत व ना ऑस्ट्रेलियात खेळू शकतील. ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडला पोहोचला आहे. एकूण २१ खेळाडू दौऱ्यावर आले, ३ टी-२० व ३ वनडे खेळातील. इंग्लिश कसोटी संघात सहभागी सॅम करेनला घरच्या बॉब विलिस ट्रॉफीसाठी सूट दिली.