आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:खेळाडूंचा सराव बंद; आफ्रिकेचा दाैरा ठरेल अवघड : बीसीसीआय

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आयपीएलची आशा कायम; आयाेजन पावसाळ्यानंतर हाेऊ शकेल : जाेहरी
  • आॅगस्टमध्ये तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेची चर्चा

लाॅकडाऊनमुळे मागील दाेन महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मैदानावरील सरावापासून दूर आहेत. त्यांचा नित्याचा सांघिक सराव पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दाैरा करणे भारतीय संघासाठी अधिकच कठीण आणि आव्हानात्मक ठरेल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली. आॅगस्टमध्ये भारतीय संघ आफ्रिकेच्या दाैऱ्यावर जाणार आहे. याच दाैऱ्यात दाेन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल अशी चर्चा आहे. मात्र, आता बीसीसीआयने स्पष्टपणे प्रतिक्रिया देऊन या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. काेेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन सध्या भारतामध्ये लाॅकडाऊनचा नियम कडक केला आहे. आफ्रिकेतही हीच गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे अशा संकटात ही टी-२० मालिका हाेणे अद्याप तरी धूसर असल्याचे बीसीसीआयने सांगितले.

आयपीएलची आशा कायम; आयाेजन पावसाळ्यानंतर हाेऊ शकेल : जाेहरी

यंदाच्या सत्रातील आयपीएलची स्पर्धा अद्यापही आयाेजित केली जाऊ शकेल, अशी माेठी आशा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आहे. त्याच्या दिशेने सध्या बीसीसीआय सक्रिय आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर आॅक्टाेबरच्या आधी ही स्पर्धा भारतामध्येच आयाेजित केली जाऊ शकेल, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाेहरी यांनी दिली. आयपीएलमध्ये सध्या माेठ्या संख्येत विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत आयपीएलचे आयाेजन हाेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. यंदाची आयपीएल रद्द हाेणे, हे बीसीसीआयला सर्वात महागात पडण्याची शक्यता आहे. या लीग रद्दमुळे बीसीसीआयला तब्बल चार हजार काेटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे हा सर्वात माेठा आर्थिक धाेका टाळण्यासाठी मंडळ धडपडत आहे.

बातम्या आणखी आहेत...