आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. कसोटी मालिकेतील चौथा सामना 9 मार्चपासून सुरू होणार आहे. हा महत्त्वाचा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज उपस्थित राहणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 8 मार्चला भारतात येत आहेत. ते 8 ते 11 मार्च दरम्यान भारतात असतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीअंतर्गत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
अँथनी अल्बानीज हे गेल्या वर्षी मे महिन्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले आणि हे पद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. 8 मार्च रोजी ते अहमदाबाद येथे उपस्थित राहणार आहेत आणि 9 मार्च रोजी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथा सामना पाहण्यासाठी जाणार आहेत. पीएम मोदी पहिल्यांदाच त्यांच्या नावावर असलेल्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना पाहणार आहेत.
ऑस्ट्रेलियाने ही अधिकृत माहिती दिली आहे, ज्यात लिहिले आहे की, 'अहमदाबाद येथे होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज पीएम मोदींसोबत सामना पाहण्यासाठी जाणार आहेत. दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे अतूट नाते आहे, त्यामुळे प्रदीर्घ मैत्री झाली आणि या मैत्रीमुळेच भारत-ऑस्ट्रेलियाच्या नात्याबद्दल आपण पुढच्या पिढीला सांगू.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत रोमांचक वळण आले आहे. पहिले दोन कसोटी सामने यजमानांनी जिंकले होते, तर इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी अहमदाबाद कसोटी दोन्ही संघांच्या संदर्भात महत्त्वाची ठरणार आहे, ज्यामध्ये टीम इंडियाला विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे आहे. तर पाहुण्या संघाला विजयासह मालिकेत बरोबरी साधायची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.