आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • PM Narendra Modi Wrote A Letter To Suresh Thanked Him For Making India A Leader In Sports Cricket News And Updates.

धोनीनंतर पंतप्रधानांचे रैनाला पत्र:मोदी म्हणाले  - तुमच्यासाठी निवृत्ती या शब्दाचा वापर करायची इच्छा नाही, संन्यासाच्या बाबतीत तुम्ही खूप तरूण आणि दमदार आहात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेंद्र सिंह धोनींच्या संन्यासानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना पत्र लिहिले होते, याच दिवशी रैनानेही निवृत्ती घोषीत केली होती
  • मोदींनी रैनाला लिहिले - मुरादनगरहून लखनौ आणि नंतर टीम इंडियाचा प्रवास खरोखर मोठी कामगिरी

15 ऑगस्ट रोजी एमएस धोनीबरोबर निवृत्तीची घोषणा करणाऱ्या सुरैश रैनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहिले आहे. रैनाने ट्विटरवर हे पत्र शेअर केले आहे. रैनाच्या फलंदाजी आणि फील्डिंग कौशल्याची मोदींनी प्रशंसा केली. 2011 च्या वर्ल्डकपमधील विजयात त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेचे वर्णन केले. मोदींनी लिहिले- मला तुमच्यासाठी निवृत्ती हा शब्द वापरायचा नाही. निवृत्तीच्या बाबतीत तू अजूनही तरूण आणि दमदार आहेस.

33 वर्षीय रैनाने पंतप्रधानांचे आभार मानले आणि लिहिले की - माझ्यासारख्या खेळाडूंनी मैदानावर देशासाठी रक्त आणि घाम गाळला. जेव्हा जेव्हा त्याला देशातील लोकांकडून आणि विशेषत: पंतप्रधानांकडून कौतुक मिळते, तेव्हा यापेक्षा मोठे काही असूच शकत नाही.

आपण महान खेळाडू
पंतप्रधानांनी रैनाला लिहिले - 15 ऑगस्ट रोजी आपण सेवानिवृत्तीची घोषणा केली. आयुष्यातील हा सर्वात कठीण निर्णय आहे. तुमच्यामध्ये अजुनही तिच ऊर्जा आहे. मैदानावर एक शानदार डाव खेळल्यानंतर आता जीवनात आणखी एका इनिंगसाठी तुम्ही 'पॅड' (फलंदाजीला जाण्यापूर्वी क्रिकेट गिअर परिधान केलेले) करत आहात. तुम्ही मुरादनगर ते लखनौ आणि त्यानंतर टीम इंडिया असा शानदार प्रवास केला आहे.

2011 वर्ल्ड कपचा संदर्भ
मोदींनी पुढे लिहिले- तुम्ही केवळ एक उत्तम फलंदाजच नाही तर उपयुक्त गोलंदाज देखील आहात. तुमची जबरदस्त फिल्डिंग सर्वोत्कष्ठ आहे. टी 20 सारख्या कठीण स्वरुपातील तुमचे यश देखील लक्षात ठेवले जाईल. 2011 वर्ल्डच्या विजयात तुमचे योगदान देशाला कायम लक्षात राहील. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबादच्या मोटेरामध्ये क्वॉर्टर फायनल खेळण्यात आली होती. मी तुमची उत्तम इनिंग पाहिली होती. मी नशिबवान आहे की, मी ती इनिंग आणि तुमच्या क्लासिक कव्हर ड्राइव्ह पाहिल्या.

मैदानाबाहेरही तुम्ही उत्तम उदाहरण निर्माण केले
पंतप्रधानांना रैनाच्या मैदानाबाहेरील योगदान आठवले. त्यांनी म्हटले की, खेळाडू फक्त मैदानात नाही, तर त्यांच्या मैदानाबाहेरील कामांमुळेही आठवणीत राहतात. हे तरुणांसाठी उदाहरण बनतील. करिअरमध्ये तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र तुम्ही हिंमतीने याचा सामना केला. तुम्ही टीम आणि देशाचे नाव उज्ज्वल केले. महिला सशक्तिकरण आणि स्वच्छ भारत अभियानात सहयोग दिला. प्रियंका (पत्नी), ग्रॅसिया आणि रिओ (मुलांची नावे) यांच्यासह आनंदी जीवन जगा. देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...