आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त मोदींचा गेल-जॉन्टीला मॅसेज:फील्डिंग मास्टर जॉन्टीला लिहिले पत्र, गेलने स्वतः सांगितले- PM मोदींच्या खास मॅसेजने सकाळ झाली

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्स यांनी बुधवारी भारताला ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गेलने सांगितले की, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विशेष संदेश मिळाला आहे. त्याचवेळी रोड्सने पंतप्रधानांनी पाठवलेले पत्रही पोस्ट केले आहे.

जॉन्टी रोड्सने पीएम मोदींच्या पत्राला उत्तर देताना लिहिले - तुमच्या प्रेमळ शब्दांबद्दल धन्यवाद. भारताच्या प्रत्येक भेटीत मला एक व्यक्ती म्हणून खूप समृद्ध वाटतं. माझे पूर्ण कुटुंब संपूर्ण भारतासोबत प्रजासत्ताक दिन साजरा करते आणि भारतातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या संविधानाचा आदर करते. जय हिंद.

मोदींनी रोड्सला पाठवले पत्र
प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएम मोदींनी जॉन्टी रोड्सला पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी रोड्सची भारताप्रती असलेली ओढ आणि प्रेम नमूद केले. आपल्या पत्रात मोदींनी जॉन्टीचे भारताच्या मित्रांपैकी एक म्हणून वर्णन केले आणि असेही लिहिले की रोड्सने आपल्या मुलीचे नाव 'इंडिया' ठेवले आहे.

रोड्सने सोशल मीडिया अकाऊंटवर मोदींनी पाठवलेले पत्र पोस्ट केले आहे-
भारताकडून शुभेच्छा, दरवर्षी २६ जानेवारीला आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा तो दिवस आहे जेव्हा आमच्या संविधान सभेच्या प्रदीर्घ चर्चेनंतर भारतीय संविधान लागू झाले. मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. या वर्षी २६ जानेवारीचे विशेष महत्त्व आहे, कारण भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून मी तुम्हाला आणि भारताच्या इतर मित्रांना पत्र लिहून तुमचे भारतावरील असलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की, तुम्‍ही आमच्‍या देशासोबत आणि लोकांसोबत एकत्र काम करत राहाल.

गेल्या काही वर्षांत तुम्ही भारत आणि येथील संस्कृतीशी एक विशेष बंध निर्माण केला आहे. तुम्ही तुमच्या मुलीचे नाव या महान देशाच्या नावावर ठेवले, तेव्हाच हे विशेष कनेक्शन स्पष्टपणे दिसून येते. तुम्ही आमच्या देशाच्या मजबूत संबंधांचे विशेष दूत आहात. मला खात्री आहे की, हे लोकांना सक्षम करेल आणि जागतिक स्तरावरही चांगले योगदान देईल. पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आगामी काळात तुमच्याशी बोलण्यास उत्सुक आहे.

गेलनेही शुभेच्छा दिल्या
ट्विटरवर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना ख्रिस गेलने लिहिले - 'मी भारताला 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. मला आज पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक संदेशाने जाग आली, ज्यामध्ये भारतातील लोकांशी माझ्या घनिष्ट वैयक्तिक संबंधांची पुष्टी केली आहे. युनिव्हर्स बॉसकडून तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि प्रेम.'

बातम्या आणखी आहेत...