आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत VS ऑस्ट्रलिया दुसरा टी-20 सामना:पोलिस अधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम, सामन्याची स्वत:ची VVIP तिकीटे दिली अनाथ मुलांना

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी नागपुरात टीम इंडियात आणि ऑस्ट्रेलिया संघात क्रिकेट सामना होणार आहे. या सामन्याची तिकिटे मिळवण्यासाठी अक्षरश: क्रिकेटप् चाहत्यांमध्ये मारामारी आणि चेंगराचेंगरी झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटांत 40 हजार तिकीटे विकली गेली.

हजारो क्रिकेट प्रेमींची निराशा झाली. तिकीटे मिळालेले खुश होते. तर न मिळालेले चाहते पाऊस पडूदे म्हणून प्रार्थना करीत होते. अर्थात पावसाने सामन्यात व्यत्यय न आणला नाही तर सामना नक्की होणार.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुलांना दिले टी-20 सामन्याचे तिकीटे
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुलांना दिले टी-20 सामन्याचे तिकीटे

या सामन्याचे 500 रूपयांचे तिकीट 1500 रूपयाला विकले गेले. कितीही किंमत मोजून क्रिकेटप्रेमी तिकीट घ्यायला तयार होते. अशा वातावरणात VCA ( विदर्भ क्रिकेट असोसिएशन)कडून मिळालेली बाॅक्स प्रवेशिकेची(स्टेडिअम वर असलेली सुपर क्लासवन लोकांसाठी बसण्याची व्यवस्था) तिकीटे येथील पोलिस अधिकाऱ्यांनी 14 अनाथ मुलांना दिली.

विशेष म्हणजे बॉक्सचे हे तिकीट तब्बल 20 हजार रूपयांना एक तिकीट असे आहे. VCA तर्फे पोलिस आयुक्तांसह काही बड्या पोलिस अधिकाऱ्यांना ही तिकीटे पाठवण्यात आली होती.

अनाथ मुलांना मिळालेली VVIP ची तिकीटे
अनाथ मुलांना मिळालेली VVIP ची तिकीटे

नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मनात एक विचार आला आपल्याला मिळालेल्या प्रवेशिकांवर कुटुंबीयांसोबत सामना पाहण्यापेक्षा अनाथ मुलांना ही तिकीटे देऊन त्यांच्या जीवनात आनंद का फुलवू नये असे त्यांच्या मनात आले. नागपूर पोलिस अधिकाऱ्यांचा एक व्हाॅटसअ‍ॅप ग्रुप देखील आहे. ही कल्पना पोलिस आयुक्तांनी पोलिस अधिकाऱ्यांचा व्हाॅटस अ‍ॅप ग्रुपवर टाकला.

त्यानंतर त्याला इतर पोलिस अधिकाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने प्रतिसाद देत त्यांचीही तिकीटे ते या अनाथ मुलांना देणार असल्याचे जाहीर केले. ही सर्व तिकीटे VVIP लोकांसाठी होती. या अनाथ मुलांनी माध्यमांशी बोलताना आपण स्टेडियममध्ये बसून सामना लाइव्ह पाहाणार आहोत यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नसल्याचे सांगितले. काय बोलावे हेच सुचत नाही अशी अनेकांची अवस्था होती. या मुलांनी पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...