आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानातून जगाला सर्वात उंच बॉलर मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पाकिस्तान टीमसाठी खेळलेला मोहंमद इरफान नक्कीच आपल्याला आठवत असेल. पण, ज्या नव्या क्रिकेटरची सध्या चर्चा आहे तो इरफान पेक्षा उंच आहे. इरफानची उंची 7.1 फूट होती. तर नवीन बॉलर मुदस्सर गुज्जर तब्बल 7.6 फुटी उंच आहे. मुदस्सरला पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये (पीएसएल) लाहोरच्या टीमने सामिल केले आहे. त्याचे वय फक्त 18 वर्षे आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानसाठी खेळताना इरफानने आपल्या वनडे करिअरमध्ये 60 सामने खेळून 83 गडी बाद केले होते. आता त्याच्यापेक्षा उंच असलेल्या मुदस्सरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा खेळवणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. असे झाल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात उंच क्रिकेटर ठरेल.
नेमकी उंची किती यावर अजुनही संभ्रम
मुदस्सरची उंची खरोखर किती यावर अजुनही संभ्रम आहे. लाहोर कलंदर्स आणि क्रीडा पत्रकार साज सादिक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर मुदस्सरची उंची 7 फूट 6 इंच असल्याचे सांगितले आहे. तर मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याची उंची 7.4 फूट असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतर एका मीडिया रिपोर्टमध्ये त्याची उंची 7.5 फूट सांगण्यात आली. तरी यापैकी कुठलाही दावा खरा ठरल्यास आणि त्याला आंतरराष्ट्रीय टीममध्ये जागा मिळाल्यास तो निश्चितच सर्वात उंच क्रिकेटरचा मान पटकावणार आहे.
हार्मोनल आजार असला तरीही ईश्वराची कृपा मानतो मुदस्सर
ब्रिटिश दैनिक डेली मेलशी बातचीत करताना मुदस्सरने आपल्या उंचीला देवाची कृपा म्हणत आभार मानले आहे. प्राथमिक शाळेत असतानाच माझी उंची 6 फूट झाली होती. मी कार चालवू शकत नाही. माझ्या साइजचे बूट मार्केटमध्ये सापडत नाहीत. डॉक्टर माझ्या परिस्थितीला हार्मोनल आजार मानत असले तरीही मी यामुळे वेगाने धावू शकतो आणि पुढे जाउन सर्वात सर्वात उंच बॉलर ठरू शकतो. मी गेल्या 7 महिन्यांपासून ट्रेनिंग घेत होतो. मधल्या काळात कोरोनाच्या महामारीमुळे प्रशिक्षण थांबले होते. लवकरच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात उंच बॉलर ठरेन असे मुदस्सर म्हणतो.
भारताविरुद्ध पाकचा मोहंमद इरफान खेळत होता तेव्हा...
2015 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना झाला त्यावेळी 7.1 फूट उंच असा इरफान पाकिस्तानचा सदस्य होता. आपल्या उंचीमुळे इरफानकडे वेग आणि बाउंस या दोन्ही गोष्टी होत्या. पाकिस्तानविरुद्ध सामना होण्यापूर्वीच खास इरफानचा सामना करण्यासाठी टीमने विशेष तयारी केली होती. सामन्यापूर्वी प्रॅक्टिस करताना नेटमध्ये दोन टेबल ठेवण्यात आले होते. त्यावरून बॉलिंग करून शिखर धवन आणि रोहित शर्मासह इतर खेळाडूंनी सराव केला होता. अशा प्रॅक्टिसने एक व्यक्ती 7 फूट उंच असल्यास बॉल 9 फुटावरून कसा पडतो आणि ते कसे खेळावे हे भारतीय क्रिकेटर्सच्या लक्षात आले. इरफान अजुनही क्रिकेट खेळत आहे पण, त्याला पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.