आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवा फलंदाज लोकेश राहुलच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जला अद्याप आपल्या पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. संघाने अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावत २०१४ मध्ये फायनलचा पल्ला गाठला हाेता. मात्र, त्यानंतर अद्याप टीमला अशी उल्लेखनीय कामगिरी करता अाली नाही. सातत्याने टीमच्या कामगिरीमध्ये घसरण झाली. तुफानी फलंदाज गेलच्या खेळीचा पंजाबला वापर करून घेता अाला नाही. त्यामुळेच त्यानंतर प्ले-ऑफमध्ये देखील स्थान मिळवू शकला नाही. यंदाच्या सत्रात त्यांनी आपले नाव बदलत किंग्ज इलेव्हन पंजाब ऐवजी पंजाब किंग्ज केले. संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये अनिल कुंबळे, अँडी फ्लावर, जाँटी रोड्स व वसीम जाफर सारखे दिग्गज आहेत. मात्र, संघात चॅम्पियन खेळाडूंची उणीव आहे. संघ १२ एप्रिल रोजी राजस्थान विरुद्ध मुंबईत आपल्या अभियानास सुरुवात करेल. त्यामुळे या सामन्यात विजयासाठी टीमला कसरत करावी लागणार अाहे. कारण, पाच वेळच्या चॅम्पियन अाणि सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई संघाची अाेळख अाहे.
मधल्या फळीत भरवशाचे फलंदाज नाहीत
सलामी फलंदाज म्हणून राहुल व मयंक अग्रवाल जोडी आहे. मात्र, या टी-२० प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजांची गरज आहे. मधल्या फळीत निकोलस पूरन चांगला आहे. एकूणच मधल्या फळीत भारतीय फलंदाजांची उणीव आहे. दीपक हुड्डा व मनदीप तेवढे भरवशाचे फलंदाज नाहीत. त्याचबरोबर, क्रिस गेलचा वापर कसा करायचा, हे संघाला कळत नाही. गत सत्रात अनेक सामन्यांनंतर त्याला खेळण्याची संधी देण्यात आली.
सुमार गाेलंदाजीमुळे संघाचा विजयाचा दावा फार कमी
मोहंमद शमीकडे अनुभव आहे, तो सलग चांगली कामगिरी करतोय. रिचर्डसन व रिले मेरेडिथला संघाने लिलावात खरेदी केले. मला वाटत नाही, ते विरोधी संघावर दबाव आणू शकतील. त्याच्याकडे आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. ईशान पोरेल लाल चेंडूचा क्रिकेटपटू नाही. फिरकीपटूमध्ये रवी बिश्नोई व मुरुगन अश्विन हे दोन लेग स्पिनर आहेत. गत सत्रात त्यांनी चांगली गोलंदाजी केली, यंदा त्या अपेक्षा आहेत.
संघासाठी चॅम्पियन हाेण्याचे स्वप्न साकारणे अाव्हानात्मक
कुंबळे, फ्लावर, जाँटी रोड्स खेळत असते, तर त्यांना विजेतेपदाचा दावेदार म्हटले असते. मात्र, सध्याच्या संघाची यादी पाहता कठीण वाटते. संघात आत्मविश्वास व दर्जा दोन्हीची कमतरता आहे. मी त्यांना यंदाचा दावेदार म्हणून पाहत नाही. शाहरुखवर लक्ष असेल.
छोटी हॉटेल; अधिक सुरक्षित
पंजाब किंग्जचा संघ सध्या छोट्या हॉटेलमध्ये थांबला आहे. तेथून सरावासाठी मैदान ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. हॉटेल, लिफ्ट, रेस्टॉरंट सर्व काही पंजाब संघासाठी आहे. ज्या ठिकाणी खेळाडू थांबले आहेत, त्याच ठिकाणी लिफ्ट उघडते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.