आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Quinton De Kock Also Criticized The Busy Schedule, Saying Playing In All Formats Is Tough, Retired From Tests Last Year.

डीकॉकनेही व्यस्त वेळापत्रकावर केली टीका:म्हणाला - सर्व फॉरमॅटमध्ये खेळणे कठीण, गेल्यावर्षी घेतली कसोटीमधून निवृत्ती

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक म्हणतो की व्यस्त वेळापत्रकात अधिक सामने समाविष्ट केले तर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडूंना भाग घेणे कठीण होईल. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वी वनडे आंतरराष्ट्रीय (ODI) मधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे अनेक दिग्गजांनी क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका केली आहे.

अनेक दिग्गजांची टीका, खेळांडूना कठीण जाणार

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने गेल्या आठवड्यात सांगितले होते की, मला स्टोक्सच्या निर्णयामागील कारणे समजली आहेत, तर इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसैन यांनी जागतिक क्रिकेट कार्यक्रमाला “वेडेपणा” म्हटले आहे.

क्विंटन डी कॉकने रविवारच्या ड्रॉ मॅच नंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, “खेळाडूंसाठी हे कठीण जाणार आहे, तीन फॉरमॅट खूप आहेत आणि वेळापत्रकामध्ये आणखी सामने होणार असल्याचे चित्र आहे.

कसोटी क्रिकेटमधून घेतली आहे निवृत्ती

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डी कॉक म्हणाला, "खेळाडूंनी वैयक्तिकरित्या हा निर्णय घ्यायला हवा आहे. जर त्यांना वाटत असेल की ते तीनही फॉरमॅटमध्ये खेळू शकतात तर मी त्यांच्यासाठी आनंदी आहे, परंतु खेळाडूंना ते घेणे आवश्यक आहे.

निर्णय त्यांच्या स्वतःच्या हातात आहे. मला काही लीग खेळण्याचा करार मिळाला आहे, पण तो माझा स्वतःचा निर्णय आहे. त्यात खेळण्यासाठी मी आनंदीत आहे."

IPL 15 मध्ये LSG कडून चांगली कामगिरी

तो म्हणाला, “हे अजून एक त्याग आहे, पण मी हळूहळू वयात येत आहे जिथे मला माझ्या करिअरमध्ये कुठे खेळायचेआहे याचा विचार करणे आवश्यक आहे. जोपर्यंत मी माझ्या गतीने हे करू शकतो तोपर्यंत मी आनंदी आहे.

जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्हाला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायची इच्छा असते आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही गोष्टी साध्य करायच्या असतात. जसजसे तुम्ही वयाने मोठे होत जाता तसतसे सगळ्या फॉरमॅट खेळणे कठीण होवून जाते आणि शरीर पूर्वीसारखे सपोर्टिव्ह राहत नाही. ही फक्त मॅनेजमेंट करण्याची बाब आहे.

" डी कॉक हा IPL 2022 च्या 15 हंगामात LSG कडून खेळत होता. प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या KKR विरूद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावून त्याने आपला फॉर्म आणि वर्ग दोन्ही दाखवून दिले. यावेळी डी कॉकने 70 चेंडूत 140 धावा केल्या. 200 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या खेळीत त्याने 10 चौकार आणि 10 षटकारही मारले आहेत.

बातम्या आणखी आहेत...