आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिडनी कसोटीत सलग दुसर्या दिवशीही मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियन दर्शकांकडून वर्णभेदी टिप्पणी केल्याची तक्रार केली. सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणे आणि इतर खेळांडूनी पंच पॉल राफेल यांच्याकडे देखील याबाबत तक्रार केली. त्यानंतर मॅच रेफरी आणि टीव्ही पंचांशी बोलल्यानंतर पंचांनी पोलिसांना बोलावले.
यादरम्यान काही वेळासाठी खेळ देखील थांबवला होता. पोलिसांनी 6 प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर काढले. यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) देखील टीम इंडियाची माफी मागितली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या 86 व्या षटकातील घटना
ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 86 व्या षटकातील आहे. सिराज सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यानंतर प्रेक्षकांकडून टिप्पणी केल्यानंतर त्याने अंपायरकडे याची तक्रार केली. अंपायर यांनी पोलिसांना बोलावले आणि सीमेरेषेजवळील स्टँडमध्ये चौकशी केली. यानंतर काही लोकांना स्टेडियमच्या बाहेर काढले.
CA म्हणाले - कारवाई केली जाईल
याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA)भारतीय संघाची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, वर्णभेटी टिपण्णी बद्दल आमची झिरो टॉलरेंस पॉलिसी आहे. अशा प्रकारची घटना आम्ही अजिबात खपवून घेणार नाही आणि याप्रकरणी कारवाई केली जाईल.
Cricket Australia has reaffirmed its zero-tolerance policy towards discriminatory behaviour in all forms following the alleged racial abuse of members of the Indian cricket squad by a section of the crowd at the Sydney Cricket Ground on Saturday: Cricket Australia pic.twitter.com/FCyXtNQR0y
— ANI (@ANI) January 10, 2021
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.