आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसाेटी:राेहित दुसऱ्या कसाेटीलाही मुकणार, लाेकेशची नजर मालिका विजयावर; काेहलीचा कसून सराव

मीरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत-बांगलादेश दुसरी कसाेटी येत्या गुरुवारपासून

येत्या गुरुवारपासून भारत आणि यजमान बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसाेटी सामन्याला सुरुवात हाेणार आहे. मीरपूरच्या मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. यादरम्यान भारतीय संघाचा नियमित कर्णधार राेहित शर्मा सहभागी हाेऊ शकणार नाही. ताे अद्याप गंभीर दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळेच त्याला या दुसऱ्या कसाेटीतही सहभागी करण्यात येणार नाही. त्याला आगामी मालिकेच्या दृष्टीने विश्रांती देण्यात आली.

यातून आता लाेकेश राहुल मालिकेतील दुसऱ्या कसाेटीतही प्रभारी कर्णधाराच्या भूमिकेत कायम राहणार आहे. त्याच्या कुशल नेतृत्वाखाली टीम इंडियाने रविवारी विजयी सलामी दिली. भारताने १८८ धावांनी सलामीच्या कसाेटीत बांगलादेशवर विजय साजरा केला. आता लाेकेश राहुलची नजर आपल्या नेतृत्वात टीम इंडिया मालिका जिंकून देण्यावर लागली आहे. राेहित शर्माला यजमान बांगलादेश संघाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली. ताे आता श्रीलंकेविरुद्ध मालिकेदरम्यान पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

बातम्या आणखी आहेत...