आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2020-2021:राेहितची अर्धशतकी खेळी; टीम इंडियासाठी विजयाची वाट खडतर

सिडनी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाने दिले ४०७ धावांचे आव्हान, भारत २ बाद ९८ धावा, राेहितचे विदेशात सलामीवीरच्या भूमिकेत पहिले अर्धशतक

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला ४०७ धावांचे आव्हान दिले. सामन्याच्या चौथ्या दिवशी रविवारी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ बाद ३१२ धावांवर डाव घोषित केला. कॅमरून ग्रीनने सर्वाधिक ८४ धावा काढल्या. हे त्याचे पहिले कसोटी अर्धशतक ठरले. दिवसअखेर भारताने २ बाद ९८ धावा केल्या. रोहित शर्माने ५२ धावा काढल्या. त्याचे सलामीवीर म्हणून विदेशात पहिले अर्धशतक ठरले. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ३०९ धावा कराव्या लागतील. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्मा (५२) व शुभमन गिल (३१) यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ७१ धावांची सलामी दिली. हेझलवूडने शुभमनला बाद करत जोडी फोडली. दिवसाचा खेळ संपण्यास २२ चेंडू शिल्लक असताना पॅट कमिन्सच्या चेंडूवर पुल करण्याच्या प्रयत्नात रोहित बाद झाला. चेतेश्वर पुजारा (९*) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (४*) खेळत आहेत. भारतीय संघ चौथ्या डावात आतापर्यंत केवळ तीन वेळा ४०० पेक्षा अधिक धावा करू शकला आहे. अखेरच्या वेळी संघाने १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद १०३ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली हाेती.

चौथ्या डावात सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाने तीन वेळा चौथ्या डावात ४०० पेक्षा अधिक धावा केल्या. सर्वाधिक ४४५ धावा संघाने जानेवारी १९७८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडिलेड कसोटीत काढल्या होत्या. मात्र, हा सामना आपण ४७ धावांनी गमावला होता. त्याचबरोबर, एप्रिल १९७६ मध्ये संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ४ बाद ४०६ धावा करत सामना जिंकला होता. भारताने अखेरच्या वेळी इंग्लंड विरुद्ध ऑगस्ट १९७९ मध्ये ८ बाद ४२९ धावा करत सामना बरोबरीत राखला होता.

वर्णद्वेषी टीका: त्या चाहत्यांची स्टेडियममधून हकालपट्टी
सामन्यात सलग दुसऱ्या दिवशी मो. सिराजवर चाहत्यांनी वर्णद्वेषी टीका केली. सिराजने अंपायर पॉल राफेलकडे तक्रार केली. त्यानंतर अंपायरने सामना रेफरी आणि टीव्ही अंपायरशी चर्चा करत पोलिसांना बोलावले. यादरम्यान खेळ थांबवण्यात आला होता. ६ चाहत्यांना स्टेडियम बाहेर काढण्यात आले. आता ते अखेरच्या दिवशी सामना पाहू शकणार नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) या घटनेबद्दल भारतीय संघाची माफी मागितली. कठोर कार्यवाही करणार असल्याचे म्हटले. आयसीसीने देखील नाराजी व्यक्त केली आणि सीएच्या अहवालानंतर कार्यवाही करणार असल्याचे म्हटले. आॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न व माइक हसीने या चाहत्यांना आजीवन बंदी घालण्याची मागणी केली. आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगरने या घटनेला लज्जास्पद म्हटले.

बातम्या आणखी आहेत...