आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Rahul Dravid | Your Dreams Come True By Walking With Everyone, Podcast Of Happiness, A Way To Learn And Move Forward In Life Rahul Dravid

राहुल द्रविड पॉडकास्ट:सर्वांना सोबत घेऊन चालण्यानेच पूर्ण होतात आपली स्वप्ने, आनंदाचे पॉडकास्ट आयुष्यात शिकत पुढे जाण्याचे मार्ग- राहुल द्रविड

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणतेही स्वप्न एकट्याने पूर्ण होत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन चालल्यावर स्वप्ने साकार करणे सोपे जाते. मग सर्व अपयशानंतरही आपण प्रयत्न करणे थांबवत नाही. कुटुंब आणि मित्रांची साथ महत्त्वाची आहे, कारण ते कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभे असतात.

संघर्ष कधीच सुडाचा नसावा. आम्ही बदला घेण्यासाठी खेळत नाही, सन्मान आणि अभिमानासाठी खेळतो. देवावर विश्वास ठेवा, तो उशिरा का होईना, आपल्याला नक्कीच साथ देतो. प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि आता भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विविध भाषणे आणि पॉडकास्टमध्ये अशाच गोष्टी सांगितल्या आहेत.

प्रत्येकाची स्वतःची पद्धत... संकटांना तोंड देण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते. ते त्याचे व्यक्तिमत्त्व असते. मला संकटांशी लढून बाहेर यायला आवडते. बाहेरून मी अनेकदा संघर्ष करताना दिसत होतो, परंतु आतून मी शांत राहून फक्त निकालांवर लक्ष केंद्रित करत असे. इतरांच्या उत्कटतेतून शिका... इतरांचे झपाटलेपण पाहून आपल्याला प्रेरणा मिळते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जीव पणाला लावणारे, त्याग करणारे लोक पाहतो, तेव्हा आपल्यालाही काही तरी करण्याची तळमळ वाटते.

आपली बॅटरी रिचार्ज करा...
उद्दिष्ट साध्य करण्याची तयारी जितकी महत्त्वाची, तितकीच त्या मेहनतीतून वेळोवेळी ब्रेक घेणेही महत्त्वाचे आहे. आपण मानसिकदृष्ट्या न खचणे महत्त्वाचे आहे. स्वतःला आराम देण्याचा मार्ग शोधावा. उदा. पुस्तके वाचल्याने माझी बॅटरी रिचार्ज होते.

क्रिकेटमधून बळकट होणे शिका...
क्रिकेट शैथिल्यातून बाहेर पडण्यास मदत करते. एखाद्या दिवशी आपण चांगले खेळतो, तर एखाद्या दिवशी वाईट. खेळाच्या पद्धतीही अनेक असतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची सवय लागते.

बातम्या आणखी आहेत...