आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ॲनालिसिस:द्रविडची वाट खडतर; 2013 नंतर पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकणे आव्हानात्मक

मुंबई / चंद्रेश नारायणन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा दावेदार निश्चित झालाय. माजी कर्णधार राहुल द्रविड. मात्र, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला काही काळापूर्वीपर्यंत प्रशिक्षकाची जबाबदारी घ्यायची नव्हती. आता त्याने बीसीसीआयची विनंती स्वीकारली आहे.

अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग यांच्याशी प्रथम चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला. या सर्वांनी नकार दिल्यानंतर बीसीसीआय पुन्हा द्रविडकडे गेली. दुबईत आयपीएल फायनलपूर्वी द्रविडने बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, असे मानले जाते. द्रविडने संकेत दिले की, तो भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारू शकतो. त्याने प्रशिक्षकाचे पद घेण्यास नकार दिला असता तर एनसीएमधील त्याचे स्थानही डळमळीत झाले असते. द्रविड तयार झाला आहे, तरीही मंडळ देखाव्यासाठी संपूर्ण प्रक्रिया करेल. या पदासाठी अर्ज मागवले जातील, क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) मुलाखत घेईल. त्यानंतर द्रविडच्या नावाची घोषणा हाेईल.

काेहली साेडणार नेतृत्व; नव्या कर्णधारपदी राेहित :
टी-२० विश्वचषकानंतर प्रशिक्षक बनताच द्रविडवर मोठी जबाबदारी असेल. विराट टी-२० चे कर्णधारपद सोडत आहे. रोहित हा या पदाचा दावेदार असल्याचे मानले जात आहे. या बदलत्या टप्प्यात द्रविडला संघ सांभाळावा लागेल. त्याचबरोबर, विराट कोहलीलाही सांभाळणे हे त्याच्यापुढे आणखी मोठे आव्हान असेल. २०१७ मध्ये द्रविड आणि जहीर यांना संघाचे सल्लागार बनवण्यात आले. पण कोहली आणि शास्त्रीचा विरोध होता. २०१५ पासून द्रविडच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेतलेले अनेक युवा खेळाडू भारतीय संघाचे सदस्य बनले आहेत.

एनसीएमध्ये बदलाचे वारे :
पारस , अभय शर्मा, सितांशू कोटक आणि हृषीकेश कानिटकरसारखे प्रशिक्षक एनसीएमध्ये त्याच्यासोबत काम करतात. आता द्रविडच्या आगमनानंतर नवीन पद्धत येऊ शकते. शास्त्री प्रशिक्षकापेक्षा दिग्दर्शकाची भूमिका अधिक बजावतात.

बातम्या आणखी आहेत...