आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीएमध्ये फिटनेस चाचणी:राहुलची शनिवारी फिटनेस चाचणी

बंगळुरू18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा सलामीवीर के.एल. राहुल इंग्लंड दौऱ्यासाठी संघाबाहेर होऊ शकतो. तो अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. राहुलची शनिवारी बंगळुरू येथील एनसीएमध्ये फिटनेस चाचणी होणार आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “राहुलची प्रकृती सुधारण्यास वेळ लागतोय, हे चांगले लक्षण नाही. दुसरा गट निघण्यापूर्वी आमच्याकडे तीन ते चार दिवस बाकी आहेत. शनिवारी फिटनेस चाचणी होणार आहे. त्यामध्ये जर तो पास झाला, तर प्रशिक्षक द्रविड, श्रेयस आणि पंत यांच्यासोबत रवाना होईल. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर आम्ही त्याच्या पुनर्प्राप्तीची प्रक्रिया सुरू ठेवू.’ इंग्लंड व भारत यांच्यात १ कसोटी, ३ वनडे व ३ टी-२० सामने खेळवले जातील. या मालिकेची सुरुवात पुन्हा निर्धारित कसोटी सामन्याने १ जुलै रोजी होईल.

बातम्या आणखी आहेत...